शाहरुख खान फॅन्सना देणार नववर्षाचे हे गिफ्ट, अनुष्का शर्माने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 12:10 IST2018-01-01T06:35:50+5:302018-01-01T12:10:26+5:30

शाहरुख खान त्याच्या फॅन्सना नवे वर्षाचे गिफ्ट देणार आहे. याचा खुलासा अनुष्का शर्माने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. आज ...

Shahrukh Khan will give this new year gift to Anwar, Anushka Sharma | शाहरुख खान फॅन्सना देणार नववर्षाचे हे गिफ्ट, अनुष्का शर्माने केला खुलासा

शाहरुख खान फॅन्सना देणार नववर्षाचे हे गिफ्ट, अनुष्का शर्माने केला खुलासा

हरुख खान त्याच्या फॅन्सना नवे वर्षाचे गिफ्ट देणार आहे. याचा खुलासा अनुष्का शर्माने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता शाहरुख या गोष्टीची घोषणा करणार आहे. 

आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटाच्या नावाची घोषणा करणार आहे. 2018 मध्ये एल राय आनंद यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपट शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव अजून गुलदस्तात आहे. या चित्रपटाचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखचे फॅन्स त्याला विचारतायेत. याचीच घोषणा तो आज संध्याकाळी करणारा आहे.  या चित्रपटात शाहरूख एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. या चित्रपटात कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. यात ती ‘मेरी जान’ नामक पात्र साकारणार आहे. आधी हा चित्रपट सलमान खान करणार होता. त्याला ही कथा प्रचंड आवडली होती. पण अचानक सलमानने या चित्रपटाला नकार कळवला आणि हा चित्रपट शाहरूखकडे आला.  मुंबईत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. 

ALSO READ :  ​टेड टॉक्स इंडिया या कार्यक्रमात या व्यक्तीला भेटून शाहरुख खानला झाला आनंद

सध्या शाहरूख खान ‘टेड टॉक्स’ या टीव्ही शोमध्ये बिझी आहे. टेड टॉक्स इंडिया नयी सोच या कार्यक्रमाची टीम आणि शाहरुख खान भारतीय प्रेक्षकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करणार आहेत. अधिक चांगल्या उद्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच मदत करणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील कल्पनांकडे हा शो वेगळ्‌या दृष्टिकोनातून पाहायला लोकांना शिकवणार आहे.  शाहरूख यापूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’,‘क्या आप पांचवी पास से तेज है’, ‘जोर का झटका’ अशा शोमध्ये दिसला आहे. 

Web Title: Shahrukh Khan will give this new year gift to Anwar, Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.