शाहरुख खान झळकणार बाहुबली 2 मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 10:42 IST2017-02-14T05:12:57+5:302017-02-14T10:42:57+5:30

शाहरुख खानचा रईस हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. या चित्रपटातील शाहरुखने साकारलेली डॉनची भूमिका प्रेक्षकांना ...

Shahrukh Khan will be seen in Bahubali 2 | शाहरुख खान झळकणार बाहुबली 2 मध्ये

शाहरुख खान झळकणार बाहुबली 2 मध्ये

हरुख खानचा रईस हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. या चित्रपटातील शाहरुखने साकारलेली डॉनची भूमिका प्रेक्षकांना खूप भावत आहे आणि आता शाहरुख एका मोठ्या बजेटच्या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. प्रभासच्या बाहुबलीमध्ये आता बॉलिवूडचा एक सुपरस्टार दिसणार असल्याची चर्चा आहे. शाहरुख खान बाहुबली 2 या चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख खानच्या फॅन्ससाठी ही खूपच चांगली बातमी आहे. कारण पहिल्यांदाच शाहरुख एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. 
आखिर कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाच्या उत्तराची वाट सगळेच आतुरतेने पाहात आहेत. बाहुबली द बिगनिंग या चित्रपटानंतर बाहुबली 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. बाहुबली द कन्क्ल्युजनचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू असून या चित्रपटाची संपूर्णच टीम हा चित्रपट यशस्वी बनवण्यासाठी मेहनत घेत आहे.  हा चित्रपट 28 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

baahubali the beginning
शाहरुख खानने आपल्या चित्रपटात काम करावे अशी बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांची इच्छा आहे आणि त्यासाठी सध्या ते शाहरुखसोबत त्याच्या भूमिकेबाबत चर्चा करत आहेत. शाहरुखची या चित्रपटातील भूमिका काय आणि कोणती असणार आहे याबाबत अद्याप कोणतीही घोषणा चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आलेली नाही. पण शाहरुखची भूमिका ही पाहुण्या कलाकाराची असणार असल्याची चर्चा आहे. शाहरुखची या चित्रपटात भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची असणार असल्याचे म्हटले जात आहे. 
बाहुबली हा बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटात आणखी एक सुपरस्टार झळकल्यास हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडणार यात काही शंकाच नाही. 

Web Title: Shahrukh Khan will be seen in Bahubali 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.