अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मध्ये काम करायचं होतं पण..; शाहरुख खानचं IIFA सोहळ्यात मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 09:39 IST2024-10-03T09:38:06+5:302024-10-03T09:39:47+5:30

IIFA पुरस्कार सोहळा नुकताच अबू धाबीला पार पडला. या सोहळ्यात शाहरुख खानने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात तो आधी काम करण्यास उत्सुक होता असं म्हणाला (shahrukh khan)

shahrukh khan wants work in allu arjun pushpa 2 reveal iifa awards 2024 with vicky kaushal | अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मध्ये काम करायचं होतं पण..; शाहरुख खानचं IIFA सोहळ्यात मोठं वक्तव्य

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मध्ये काम करायचं होतं पण..; शाहरुख खानचं IIFA सोहळ्यात मोठं वक्तव्य

'झुकेगा नही साला' म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील अल्लू अर्जुनचा अभिनय, रश्मिकाचा डान्स आणि फहाद फजिलचा खलनायकी थाटाचा पोलीस चांगलाच गाजला. या सिनेमाचा दुसरा भाग याच वर्षी डिसेंबरमध्ये येणार आहे. 'पुष्पा' सिनेमात किंग खान अर्थात शाहरुखने काम करण्याची इच्छा प्रकट केली होती. पण शाहरुखने नंतर 'पुष्पा' सिनेमा का नाकारला, याचा खास किस्सा IIFA पुरस्कार सोहळ्यात सांगितला आहे.

शाहरुखने सांगितलं त्याने  'पुष्पा'मध्ये काम का केलं नाही?

IIFA पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलने शाहरुखला काही मजेशीर प्रश्न विचारले. त्यावेळी विकीने शाहरुखला सुपरहिट सिनेमा 'पुष्पा'बद्दल काही प्रश्न विचारले. "तुम्ही या ब्लॉकबस्टर सिनेमात काम करण्याची संधी गमावली का?" यावर शाहरुखने हसत हसत सांगितलं की, "हा असा प्रश्न आहे जो मला कायम दुःखी करतोय. खरं सांगायचं तर 'पुष्पा' सिनेमात काम करण्याची माझी इच्छा होती. परंतु अल्लू अर्जुन सरांची स्टाईल आणि त्यांचा स्वॅगशी मिळतंजुळतं होणं माझ्यासाठी कठीण होतं." असं म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. 

'पुष्पा २' ची उत्सुकता शिगेला

'पुष्पा २' बद्दल चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी निर्मात्यांनी ७५ दिवसांचं एक नवीन पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज केलं. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, ७५ दिवसांत, जगाला पुष्पा आणि त्याची अतुलनीय प्रतिमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळेल का? #Pushpa2TheRule भारतीय चित्रपटसृष्टीत एक अभूतपूर्व अध्याय बनेल. हा सिनेमा ६ डिसेंबर, २०२४ रोजी प्रदर्शित होईल. या घोषणेनंतर चाहत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अशाप्रकारे 'पुष्पा २'बद्दलची उत्सुकता शिगेला आहे.

Web Title: shahrukh khan wants work in allu arjun pushpa 2 reveal iifa awards 2024 with vicky kaushal