रणबीर, आलिया अन् विकीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:09 IST2024-11-26T14:08:23+5:302024-11-26T14:09:26+5:30

सजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 2026 च्या ईदला रिलीज होणार आहे.

ShahRukh Khan To Make A Cameo In Ranbir Kapoor, Alia Bhatt And Vicky Kaushal's Love And War | रणबीर, आलिया अन् विकीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, कोण आहे तो?

रणबीर, आलिया अन् विकीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, कोण आहे तो?

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच चित्रपटाची स्टारकास्ट समोर आली होती. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत बॉलिवूडमधलं त्रिकुट दिसणार आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट (Alia Bhat) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता अशातच या चित्रपटात एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. 

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'लव्ह अँड वॉर' या बहुप्रतिक्षित चित्रपटात किंग खान शाहरुख हा कॅमिओ करणार आहे. शाहरुख खानने यापूर्वी संजय लीला भन्साळीसोबत 'देवदास'मध्ये काम केले आहे. 'लव्ह अँड वॉर' व्यतिरिक्त शाहरुख स्पाय युनिव्हर्सच्या 'वॉर 2'मध्ये कॅमिओ करणार आहे. शाहरुख खान सध्या 'किंग' सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. याआधी किंग खानने रणबीरच्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात ताहिर आणि ब्रह्मास्त्रमध्ये मोहन भार्गवचा कॅमिओ केला होता. 

संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 2026 च्या ईदला रिलीज होणार आहे. संजय लीला भन्साळी आणि  रणबीर कपूर हे 17वर्षानंतर पुन्हा एकत्र येत आहेत.  याआधी संजय लीला भन्साळी यांनी  रणबीर कपूरला 'सावरिया' सिनेमातून अभिनेता म्हणून प्रथम संधी दिली होती. दरम्यान, गोव्यात सुरू असलेल्या 55 व्या इफ्फीमध्ये रणवीर कपूर म्हणाला,  "भन्साळी माझे गॉड फादर आहेत, त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. सिनेमा आणि अभिनय याबाबत मला जी काही माहिती आहे ती त्यांच्यामुळेच. ते अजिबात बदलले नाहीत". 

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला शेवटचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' होता. ज्यामध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. गेल्या वर्षी, संजय लीला भन्साळी यांनी OTT मध्ये हीरामंडी या मालिकेद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. लवकरच ते 'हिरामंडी'चा दुसरा सीझन घेऊन येणार आहे. याशिवाय ते आगामी 'मन बैरागी' या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Web Title: ShahRukh Khan To Make A Cameo In Ranbir Kapoor, Alia Bhatt And Vicky Kaushal's Love And War