साधासुधा नाहीये शाहरुखचा कॉफी मग; किंमत आणि त्यातील फिचर्स पाहून व्हाल शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:35 PM2023-08-08T13:35:13+5:302023-08-08T13:36:06+5:30

Shahrukh khan: शाहरुखचा कॉफी मग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

shahrukh-khan-super-expensive-coffee-mug-price-is-35-thousand | साधासुधा नाहीये शाहरुखचा कॉफी मग; किंमत आणि त्यातील फिचर्स पाहून व्हाल शॉक्ड

साधासुधा नाहीये शाहरुखचा कॉफी मग; किंमत आणि त्यातील फिचर्स पाहून व्हाल शॉक्ड

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत येत असतो. यात बऱ्याचदा त्याच्या अभिनयासह त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलची चर्चा रंगते. यावेळी सध्या शाहरुखचा कॉफी मग चर्चेत आला आहे. शाहरुख वापरत असलेला कॉफी मग प्रचंड महाग असून त्याच्या अनेक फिचर्सचा समावेश आहे.

सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०१७ मधील असून यात त्याने त्याच्या कॉफी मगची एक झलक दाखवली आहे. विशेष म्हणजे शाहरुखने या कॉफी मगचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी या मगची किंमत आणि त्यातील फिचर्स

किती आहे शाहरुखच्या कॉफी मगची किंमत?

सेलिब्रिटींच्या लक्झरी लाइफस्टाइलविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी कोणतीही साधी किंवा स्वस्तातली वस्तू वापरत नाही. प्रत्येक कलाकाराकडे प्रचंड महाग अशा वस्तू असतात. तसाच शाहरुखचाही हा कॉफी मग कोणता साधासुधा नाही. या कॉफी मगसाठी त्याने ३५ हजार ८६२ रुपये खर्च केलं आहे. विशेष म्हणजे एका कॉफी मगची किंमत ३५ हजार रुपये असल्याचं ऐकल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भुवया वर केल्या. मात्र, या कॉफी मगमध्ये अनेक खास फिचर असल्यामुळे तो महाग आहे.

काय आहेत या मगमध्ये फिचर्स

शाहरुखकडे असलेला कॉफी मग काचेचा नाहीये. या मग मध्ये हिटर आणि एलईडी लाइटिंगसारखे खास फिचर्स आहेत. सोबतच तो एकदा चार्ज केल्यानंतर तीन तासपर्यंत त्यातील पदार्थ गरम राहतो. सोबतच चार्जिंग कोस्टरही यात आहे. या कॉफी मगवर प्लस आणि मायनसचं चिन्ह असून त्यावरुन मगचं टेम्प्रेचर आपल्या सोईनुसार ठरवता येतं.

दरम्यान, या कॉफी मग प्रमाणेच त्याच्याकडे अन्यही काही महागड्या वस्तू आहेत. शाहरुख लवकरच जवान या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सिद्धी डोगरा आणि सान्य मल्होत्रा स्किन शेअर करणार आहेत.
 

Web Title: shahrukh-khan-super-expensive-coffee-mug-price-is-35-thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.