शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:33 IST2025-10-06T14:33:03+5:302025-10-06T14:33:35+5:30
शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' मध्ये दिसलेली, कोण आहे ही?

शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा 'ओम शांती ओम' सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमातून दीपिका पादुकोण ही टॅलेंटेड अभिनेत्री बॉलिवूडला मिळाली.'शांती' या भूमिकेमुळे आणि आपल्या सौंदर्यामुळे तिने लक्ष वेधून घेतलं. तसंच सिनेमातील एका गाण्यात ढीगभर कॅमिओही होते. दरम्यान एका सीनमध्ये शाहरुख खानच्या मागे ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून उभी असलेली ही अभिनेत्री आज एका अभिनेत्याची पत्नी आहे. कोण आहे ती?
तर फोटोमधला हा सीन आठवतोय? शाहरुखने सिनेमात ओम ही भूमिका साकारली होती. ओम चा पुनर्जन्म झाल्यानंतरचा हा सीन आहे. यावेळी शाहरुखच्या मागे एक ज्युनिअर आर्टिस्ट उभी आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून आता अभिनेता रणदीप हुड्डाची पत्नी लिन लैशराम आहे. लिनने अनेक हिंदी सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. ओम शांती ओम मधलाही तिचा हा सीन आहे. ओमच्या टीममधली ती एक मुलगी असते असा तिचा तो रोल होता. सिनेमाची दिग्दर्शिका फराह खानने नुकतंच मुकेश छाबडा यांना दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.
लिन लैशराम ही न्यूयॉर्क स्थित एका ज्वेलरी ब्रँडची अँबेसिडर होती. तिने मिस नॉर्थ ईस्टचं प्रतिनिधित्वही केलं होतं. तर २००८ मध्ये शिलाँगमध्ये आयोजित स्पर्धेत रनर अप राहिली. तिने काही रिएलिटी शो केले. 'जाने जान','रंगून','मटरु की बिजली का मंडोला','मेरी कोम' या सिनेमांमध्ये ती छोट्या भूमिकांमध्ये दिसली आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपमध्ये लिन आणि रणदीप हुड्डा यांची मैत्री झाली. अनेक वर्ष डेट केल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी नातं जाहीर केलं. २०२३ मध्ये त्यांनी इंफाळ येथे पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.