Shahrukh Khan: शूटिंग सेटवरून समोर आला शाहरूख खानचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'लॉयन'च्या सेटवर किंग खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:06 IST2022-04-08T12:06:44+5:302022-04-08T12:06:57+5:30

Shahrukh Khan : असं सांगितलं जात आहे की, या सिनेमाचं टायटल 'लॉयन' असू शकतं. पण शाहरूख कोणत्या सिनेमाचं शूटिंग करत आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

Shahrukh Khan spotted shooting for his next project fans think its Atlee's film lion | Shahrukh Khan: शूटिंग सेटवरून समोर आला शाहरूख खानचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'लॉयन'च्या सेटवर किंग खान

Shahrukh Khan: शूटिंग सेटवरून समोर आला शाहरूख खानचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'लॉयन'च्या सेटवर किंग खान

शाहरूख खान  (Shahrukh Khan) गुरूवारी सायंकाळी मुंबईत त्याच्या एका आगामी सिनेमाचं शूटिंग करताना दिसला. सोशल मीडियावर जसे शूटिंगचे फोटो समोर आले फॅन्सने वेगवेगळे अंदाज लावणं सुरू केलं. काही लोकांनुसार, शाहरूखने एटलीसोबतच्या (Atlee) आगामी सिनेमाचं शूट सुरू केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, या सिनेमाचं टायटल 'लॉयन' असू शकतं. पण शाहरूख कोणत्या सिनेमाचं शूटिंग करत आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

सोशल मीडियावर शाहरूखच्या फॅन क्लबने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात शाहरूख अॅम्बूलन्समध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसत आहे. यात त्याचा चेहरा कपड्याने झाकलेला आहे. केवळ त्याचे डोळे दिसत आहे. केसही लांब आहेत.

एका फॅनने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, 'हा तर लॉयनच्या सेटवर किंग खान आहे. एका दुसऱ्या फॅनने इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत लिहिलं की, 'तर आता हे कन्फर्म झालं की, शाहरूख एटलीसोबत लायनचं शूटिंग करत आहे'. याआधीही अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, शाहरूख एटलीच्या लायनमध्ये काम करणार आहे. 

एटलीच्या सिनेमाआधी शाहरूख खान अॅक्शन-थ्रीलर ड्रामा 'पठाण' मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून यात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहे. 'पठाण'च्या माध्यमातून जवळपास ४ वर्षांनंतर सिनेमात कमबॅक करत आहे. हा सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार  आहे. 
 

Web Title: Shahrukh Khan spotted shooting for his next project fans think its Atlee's film lion