"सेन्स ऑफ ह्युमर दाखवायची भीती वाटते" शाहरुख खानने सांगितलं कारण; म्हणाला, 'आजकाल लोक...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:13 IST2024-10-18T12:12:24+5:302024-10-18T12:13:29+5:30

शाहरुख खान असं का म्हणाला?

Shahrukh Khan says in today s time my sense of humour is taken wrongly | "सेन्स ऑफ ह्युमर दाखवायची भीती वाटते" शाहरुख खानने सांगितलं कारण; म्हणाला, 'आजकाल लोक...'

"सेन्स ऑफ ह्युमर दाखवायची भीती वाटते" शाहरुख खानने सांगितलं कारण; म्हणाला, 'आजकाल लोक...'

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) सेन्स ऑफ ह्युमर तर सर्वांनाच ठाऊक आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या हजरजबाबीपणाचा प्रत्यय आला आहे. पण आता शाहरुखने ह्युमर न दाखवण्याचं ठरवलं आहे. मजा मस्ती करणं सध्या महागात पडतं असं त्याचं म्हणणं आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने हे विधान केलं आहे. नक्की काय म्हणाला किंग खान वाचा.

शाहरुख खान लोकान्नो फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. यावेळी मीट्स पॉडकास्टमध्ये शाहरुख खान  म्हणाला, "मला कॉमेडी फिल्म्स करायच्या आहेत. मात्र माझ्या सेन्स ऑफ ह्युमरला लोक चुकीच्या पद्धतीने घेतात. खरं सांगायचं तर माझा सेन्स ऑफ ह्युमर आधीपासूनच चांगला आहे. मी लोकांना हसवू शकतो पण ही सध्या वेळ खूप चुकीची आहे. म्हणून मी स्वत:ला वेळोवेळी थांबवतो. माझी टीम मला नेहमीच सांगते की तुझे जोक लोकांना समजत नाहीत."

तो पुढे म्हणाला,"सध्या लोक खूपच संवेदनशील झाले आहेत. आपण काहीतरी बोलणार आणि ते लोकांना लागणार. त्यापेक्षा सेन्स ऑफ ह्युमर नसलेला बरा. रोमान्स, अॅक्शन करुन झालं आता मला कॉमेडी, हॉरर चित्रपटही करायचे आहेत. एक अभिनेता म्हणून मला वाटतं की कॉमेडी करणं खूप कठीण असतं. हे खूप गांभीर्याने घ्यावं लागतं. अनेक कलाकारांना यात अपयशही येतं. मी सुद्धा एकदा यात अपयशी झालो आहे."

शाहरुख खान सध्या आगामी 'किंग' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याची लाडकी लेक सुहाना खानही मुख्य भूमिकेत आहे. अद्याप शाहरुखच्या भूमिकेविषयी अधिकची माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Shahrukh Khan says in today s time my sense of humour is taken wrongly