रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 10:46 IST2023-02-06T10:46:11+5:302023-02-06T10:46:25+5:30

शाहरुख खान आणि रेणुका शहाणे यांनी एकत्र काम केलेली मालिका माहित आहे का ?

shahrukh khan reply to renuka shahane is going vioral on internet says she is my first heroine | रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'

रेणुका शहाणेच्या ट्विटवर शाहरुखचा रिप्लाय, म्हणाला 'तुम्ही तर माझ्या पहिल्या...'

मराठी अभिनेत्री रेणुका शहाणेचे पती आशुतोष राणा यांनी शाहरुखच्या पठाण सिनेमात कर्नल लुथराची भूमिका साकारली आहे. आपल्या पतीचा सिनेमा बघण्यासाठी रेणुका शहाणे गेल्या असता त्यांनी एक ट्विट केले. यावर किंग खानचा रिप्लाय फराच मजेदार आहे. 

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर पती आशुतोष राणा यांच्यासोबतचे काही फोटो अपलोड केले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'अखेर आज मी कर्नल लुथरा यांच्यासोबत पठाण बघायला जात आहे. मौसम बिलकुल सही है, कुर्सी की पेटी बांध ली है.'

यावर शाहरुखनेही मजेदार रिप्लाय दिला आहे . त्याने ट्विट केले, 'कर्नल लुथरा यांना सांगितलंत का की तुम्ही माझ्या पहिल्या अभिनेत्री आहात. की आपण हे गुपितच ठेवायचं आहे नाहीतर ते मला एजन्सीतून काढून टाकतील.'

यावर रेणुका शहाणे लिहितात,'हाहा, त्यांच्यापासून कोणती गोष्ट लपून कुठे राहते. तुम्हीच त्यांना अंतर्यामी म्हणले आहे. आमि काहीही होऊदे ते तुम्हाला एजन्सीतून काढून टाकणार नाहीत कारण जे काम तुम्ही करता ते दुसरं कोणीच करु शकत नाही.'

करम

रेणुका शहाणे आणि शाहरुख खानचे हे ट्विटवरील संभाषण नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. आशुतोष राणा यांच्या पठाणमधील भूमिकेचेही कौतुक होत आहे. रेणुका शहाणे यांना शाहरुख पहिली अभिनेत्री म्हणतोय कारण १९८९ च्या सर्कस या टेलिव्हिजन मालिकेत दोघांनी एकत्र काम केले आहे जे फार कमी जणांना माहित आहे.

Web Title: shahrukh khan reply to renuka shahane is going vioral on internet says she is my first heroine