Pathaan Movie : 'बिग बॉस'च्या मंचावर 'पठाण'चे प्रमोशन ? शाहरुख सलमानची पुन्हा धम्माल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:56 IST2023-01-09T16:53:39+5:302023-01-09T16:56:19+5:30

अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर 'पठाण'चा ट्रेलर रिलीज होत आहे. उद्या ११ वाजता ट्रेलर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

shahrukh-khan-may-enter-on-big-boss-16-stage-salman-khan-shahrukh-khan-again-on-same-stage | Pathaan Movie : 'बिग बॉस'च्या मंचावर 'पठाण'चे प्रमोशन ? शाहरुख सलमानची पुन्हा धम्माल मस्ती

Pathaan Movie : 'बिग बॉस'च्या मंचावर 'पठाण'चे प्रमोशन ? शाहरुख सलमानची पुन्हा धम्माल मस्ती

Pathaan Movie : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या (Shahrukh khan) चाहत्यांना उत्सुकता आहे ती 'पठाण'या सिनेमाची. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर पठाण चा ट्रेलर रिलीज होत आहे. उद्या ११ वाजता ट्रेलर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. तर २५ जानेवारी रोजी पठाण चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. मात्र अजून सिनेमातील कलाकार शाहरुख खान, दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) हे प्रमोशनसाठी बाहेर पडलेले दिसत नाहीत. आता मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या मंचावर येऊन पठाण चे प्रमोशन करताना बघायला मिळेल. याचा अर्थ दोन्ही खानची मस्ती आणि दोस्ती बिग बॉसच्या मंचावर लवकरच पाहायला मिळू शकते.

पठाणमधील 'बेशरम रंग' हे गाणे समोर आल्यावर बराच वाद झाला होता, अशा परिस्थितीत पठाणचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या ट्रेलरमध्ये सलमान खानही दिसू शकतो, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यातच आता बिग बॉसमध्ये शाहरुख खान आला तर आणखी धम्माल बघायला मिळेल. दोन्ही खानच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच ठरणार आहे. 

शाहरुख खान याआधी दिलवाले या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या मंचावर येऊन गेला आहे. तेव्हा काजोल देखील सोबत आली होती. कुछ कुछ होता है चे हे त्रिकुट एकत्र आल्याने चाहते खूश झाले होते. आता पुन्हा शाहरुख आणि सलमानला एकत्र बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. याशिवाय सलमान खानचा पठाण मध्ये कॅमिओ आहे म्हणल्यावर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.  

Web Title: shahrukh-khan-may-enter-on-big-boss-16-stage-salman-khan-shahrukh-khan-again-on-same-stage