'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 04:45 PM2023-09-20T16:45:40+5:302023-09-20T16:46:28+5:30

'जवान' सिनेमा हा सोशल अजेंडा घेऊन बनवण्यात आलाय.

shahrukh khan jawan mask connection with venice has long history | 'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन

'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन

googlenewsNext

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) नुकताच प्रदर्शित झालेला 'जवान' (Jawan) बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. १२ दिवसात सिनेमा ९०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ३०० कोटींचं बजेटमध्ये असलेल्या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमातील अॅक्शन सीन्स, डायलॉग सगळंच लय भारी आहे. दरम्यान शाहरुखच्या एका लुकमध्ये त्याच्या चेहऱ्यावर मास्क दिसतो. या मास्कमागे मोठा इतिहास आहे.

'जवान'चा प्रीव्ह्यू रिलीज झाला तेव्हाच लोकांनी अॅटलीवर २००५ साली आलेल्या 'अपरिचित' सिनेमातील मास्कची कॉपी केली असे आरोप केले. पण खरंतर शाहरुखच्या या मास्कचं कनेक्शन व्हेनिसशी आहे. 'जवान' सिनेमा हा सोशल अजेंडा घेऊन बनवण्यात आलाय. मेडिकल सेक्टरमधील घोटाळा, शेतकऱ्यांवरील अत्याचार, निवडणूकांमधील अफरातफरी अशा विषयांवर भाष्य केलं आहे. यामध्येच एका सीनमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर हा मास्क दिसतो.

'द पेपरक्लीप'च्या ट्वीटनुसार, जवानमध्ये शाहरुखने घातलेला हा मास्क सोशल गॅप्स भरण्याचं काम करतो. १३ व्या शतकापासून व्हेनिसच्या लोकांचं मास्क कनेक्शन आहे. तेव्हा व्हेनिसमध्ये जात-पात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव व्हायचा. व्हेनिसच्या नागरिकांनी एकत्र येत या भेदभावाचा विरोध केला. हा विरोध त्यांनी असे मास्क वापरुन केला होता. हा त्यांनी सिस्टिमविरोधात केलेला विद्रोह होता.

'जवान' सिनेमाची स्टोरीही सिस्टीमला ताळ्यावर आणणारी आहे. म्हणूनच मेकर्सने यामध्ये मास्क वापरला आहे जो विद्रोह दर्शवणारा आहे. हा हाफ सिल्व्हर मास्क आहे. कोलम्बिना मास्कचं व्हेरिएशन आहे. जो चेहऱ्याच्या फक्त वरच्या भागावर दिसतो. त्यामुळे या मास्कमागे मोठा इतिहास दडला आहे.

Web Title: shahrukh khan jawan mask connection with venice has long history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.