"मी खूप दु:खी झालेले, कारण...", शाहरुखच्या लेकीलाही करावा लागला रिजेक्शनचा सामना, सांगितला 'तो' प्रसंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:28 IST2026-01-16T16:26:15+5:302026-01-16T16:28:49+5:30

खोलीत स्वत:ला बंद करून घेतलेलं अन्...; रिजेक्शनचा शाहरुखच्या लेकीवर झालेला 'असा' परिणाम, म्हणाली...

shahrukh khan daughter suhana khan cried a lot when he got rejected from school play says | "मी खूप दु:खी झालेले, कारण...", शाहरुखच्या लेकीलाही करावा लागला रिजेक्शनचा सामना, सांगितला 'तो' प्रसंग 

"मी खूप दु:खी झालेले, कारण...", शाहरुखच्या लेकीलाही करावा लागला रिजेक्शनचा सामना, सांगितला 'तो' प्रसंग 

Suhana Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान हा जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या आजवरच्या फिल्मी कारकि‍र्दीत त्याने एकापेक्षा एक आणि सरस चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. शाहरुखच्या पावलावर पाऊल ठेवत लेक सुहानाने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. जोया अख्तर दिग्दर्शित द आर्चिज चित्रपटातून इंडस्ट्रीत डेब्यू केला.आता लवकरच सुहाना वडिलांच्या किंग सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु, सुहानाला सुद्धा तिच्या करिअरमध्ये रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दल खुलासा केला आहे. 

'हार्पर्स बाजार इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुहाना खानने एका ऑडिशनचा किस्सा शेअर केला.  यावेळी सुहानाने असंही सांगितलं की, तिला बालपणी अभिनयाची कोणतीही आवड नव्हती. मात्र, बोर्डिंग स्कुलमध्ये गेल्यानंतर तिची अभिनयात रुची वाढू लागली. बोर्डिंग स्कुलमध्ये असताना सुहानाने एका नाटकासाठी  सहभागी होण्यासाठी ऑडिशन दिली होती. मात्र, तिला रिजेक्शनला सामोरं जावं लागलं. या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर सुहाना प्रचंड दु:खी झाली होती आणि एकटीच  खोलीत बसून रडत होती. 

त्या रिजेक्शनबद्दल बोलताना सुहाना खान म्हणाली, "मी खूप दु:खी झाले होते. कारण माझा अपेक्षाभंग झाला होता. तेव्हाच मला जाणवलं की मंचावर सादरीकरण करु शकते. मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट असते ती त्या नाटकाची किंवा प्रोजेक्टची क्रिएटिव्ह प्रोसेस... जिथे सर्वाधिक उत्सुकता ध्येय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवड असते, तिथे काहीही शक्य आहे." असं सुहानाने मुलाखतीत सांगितलं.

Web Title: shahrukh khan daughter suhana khan cried a lot when he got rejected from school play says