Suhana Khan Hot Photos, Shahrukh Khan: फोटो सुहानाचे पण भाव खाऊन गेली शाहरूखची धम्माल कमेंट, बघा काय घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:46 IST2023-01-24T16:44:32+5:302023-01-24T16:46:11+5:30

सुहाना खानने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले होते, पण त्या फोटोंपेक्षा शाहरुखच्या कमेंटचीच जास्त चर्चा रंगली.

Shahrukh Khan comment wins heart as Suhana Khan posts bold hot photos on Instagram see what happened | Suhana Khan Hot Photos, Shahrukh Khan: फोटो सुहानाचे पण भाव खाऊन गेली शाहरूखची धम्माल कमेंट, बघा काय घडलं...

Suhana Khan Hot Photos, Shahrukh Khan: फोटो सुहानाचे पण भाव खाऊन गेली शाहरूखची धम्माल कमेंट, बघा काय घडलं...

Suhana Khan Hot Photos, Shahrukh Khan reaction: शाहरुख खान याला 'किंग ऑफ रोमान्स' म्हणतात. तो त्याच्या रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. पण यासोबत तो त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि मजेदार कमेंट्ससाठी देखील लोकप्रिय आहे. शाहरुख खानने नुकतीच एक भन्नाट कमेंट केली, ज्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे. कोणत्याही मुलाखतीत किंवा विशेष संभाषणात ही गोष्ट घडलेली नाही तर हा प्रकार चक्क सोशल मीडियावर पाहायला मिळालाय.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही लवकरच नेटफ्लिक्स मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सुहानाने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या ग्लॅमरस लूकची बरीच चर्चा होत होती. सुहानाचे हे फोटो खरंच अप्रतिम होते, पण असे असूनही लोकांचे लक्ष शाहरुखच्या कमेंटकडेच वेधले गेले. सुहानाच्या पोस्टवर तिचे वडील शाहरुख खानने एक अशी कमेंट केली, ज्यामुळे तिच्या फोटोंपेक्षाही त्याच्या कमेंटलाच जास्त पसंती मिळाल्याचे दिसून आले.

सुहाना खानने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले. तीन फोटोंपैकी पहिल्यामध्ये सुहानाने डीप व्ही-नेक वाला काळा गाऊन परिधान केला होता. दुसऱ्या फोटोमध्ये सुहानाने पिंक कलरचा ड्रेस घातला होता. त्यात ती तिची आई गौरी खान, अभिनेत्री शनाया कपूर यांच्यासोबत उभी होती. तर तिसर्‍या फोटोतही सुहानाने छोटा गुलाबी ड्रेस घातला असून ती खूप हॉट आणि बोल्ड पोज देताना दिसली.

या पोस्टमध्ये, सर्व फोटोंमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती, पण या सगळ्यानंतरही शाहरुख खानची कमेंट भाव खाऊन गेली. या पोस्टवर शाहरुखने लिहिले- 'माझ्या बाळा, तू खूप सुंदर दिसत आहेस. दिवसभर पायजमा घालून घरभर फिरत होतीस त्यापेक्षा हा लूक किती वेगळा आहे!!!' शाहरुखच्या या कमेंटला तब्बल १६०० हून अधिक लाईक्स मिळाले. ते वाचून प्रत्येकजण हसण्याचे इमोजी पोस्ट करताना दिसले.

Web Title: Shahrukh Khan comment wins heart as Suhana Khan posts bold hot photos on Instagram see what happened