​वानखेडेवरील शिवीगाळ प्रकरणी शाहरुखला क्लीनचीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 11:17 IST2016-10-05T05:41:16+5:302016-10-05T11:17:49+5:30

सन २०१२ च्या ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यांदरम्यान कोलकाता नाईट रायडर्स या क्रिकेट संघाचा मालक व अभिनेता शाहरुख खान वादात सापडला ...

Shahrukh Khan clean chit in the murder case of Wankhede | ​वानखेडेवरील शिवीगाळ प्रकरणी शाहरुखला क्लीनचीट

​वानखेडेवरील शिवीगाळ प्रकरणी शाहरुखला क्लीनचीट

२०१२ च्या ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यांदरम्यान कोलकाता नाईट रायडर्स या क्रिकेट संघाचा मालक व अभिनेता शाहरुख खान वादात सापडला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता या प्रकरणी शाहरुखला  क्लिनचीट मिळाली आहे. महान्यायदंडाधिकाºयांसमोर पोलिसांचा अहवाल सादर केल्यानंतर शाहरुखने शिवीगाळ केल्याचा कुठलाही पुरावा नसल्याच्या आधारावर त्याला ही क्लिनचीट दिली गेली. या सर्व प्रकरणी शाहरुखवर पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियमवर येण्यापासून बंदी घालण्यात आली होती. मागच्याच वर्षी त्याच्यावरील ही बंदी उठविण्यात आली. 



शाहरुखने त्याच्यावरील सर्व आरोपांचे खंडन केल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.  आमच्या संघाने सामना जिंकल्यानंतर मी आणि माझी मुलं, आम्ही मैदानावर गेलो. त्याचवेळी तेथील सुरक्षा रक्षक विकास दळवी यांनी आम्हाला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर  मी फक्त सुरक्षा रक्षकांना एवढेच सांगितले की, माझ्यासोबत माझी मुलं आहेत, त्यांना कोणीही हात लावू नये. त्यानंतर माज्या मॅनेजरने माझ्या मुलांना मैदानाबाहेर नेले, अशा शब्दांत शाहरुखने स्वत:वरील आरोपाचे खंडन केल्याचे या अहवालात नमूद आहे.

Web Title: Shahrukh Khan clean chit in the murder case of Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.