Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:58 IST2024-09-30T12:56:26+5:302024-09-30T12:58:09+5:30

समंथाच्या गाजलेल्या 'ऊ अंटवावा' गाण्यावर विकी कौशल - शाहरुखने डान्स करताच अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (samantha)

shahrukh khan and vicky kaushal dance oo antava song samantha ruth prabhu reaction viral | Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया

Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया

सध्या IIFA 2024 ची चर्चा आहे. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या सोहळ्याचं खास आकर्षण ठरला ते म्हणजे शाहरुख खान. IIFA 2024 निमित्ताने अनेक वर्षांनी शाहरुखने कोणत्यातरी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलंय. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुखने यंग जनरेशनमधील अभिनेत्यांसह स्वतःला चांगलंच जुळवून घेतलं. यातच शाहरुख खान-विकीचा 'ऊ अंटवावा' गाण्यावर केलेला डान्स चांगलाच गाजला. या मूळ गाण्यावर नाचलेली अभिनेत्री समंथाची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

शाहरुख - विकीचा 'ऊ अंटवावा'वर डान्स

IIFA 2024 शाहरुख-विकीने 'ऊ अंटवावा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल झालाय. या गाण्यात शाहरुख आणि विकी 'ऊ अंटवावा' गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. यावेळी समंथा जशी अल्लू अर्जुनसोबत नाचली अगदी तशीच स्टेप विकी आणि शाहरुखने फॉलो केली. हा डान्स बघून उपस्थित सर्वच थक्क झाले. सर्वांनी शाहरुख-विकीच्या या परफॉर्मन्सला दाद दिली. समंथा सुद्धा या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. 


हा डान्स पाहून समंथा काय म्हणाली?

हा डान्स पाहून समंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर या दोघांचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. समंथा लिहिते, "I never imagined this happening in a million years" अशी खास पोस्ट समंथाने केलीय. 'ऊ अंटवावा' हे गाणं 'पुष्पा' सिनेमातील आहे. अल्लू अर्जुन आणि समंथा या दोघांनी या मूळ गाण्यावर डान्स केलाय. हे गाणं चांगलंच गाजलं. समंथा आणि अल्लू अर्जुनची डान्सची केमिस्ट्री चांगलीच गाजली. आता /पुष्पा २' मध्ये समंथा पुन्हा एकदा विशेष गाणं करताना दिसणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे

Web Title: shahrukh khan and vicky kaushal dance oo antava song samantha ruth prabhu reaction viral