शाहरुख खान आणि थलपती विजय रुपेरी पडद्यावर झळकणार एकत्र, 'जवान'च्या दिग्दर्शकाने केली आगामी सिनेमाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 16:01 IST2023-11-14T16:01:10+5:302023-11-14T16:01:45+5:30
Atlee Kumar And Shah Rukh Khan : अॅटली आणि शाहरुख खान या जोडीने 'जवान' सारखा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. आता दिग्दर्शकाने किंग खान आणि विजय सेतुपतीसोबतच्या त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

शाहरुख खान आणि थलपती विजय रुपेरी पडद्यावर झळकणार एकत्र, 'जवान'च्या दिग्दर्शकाने केली आगामी सिनेमाची घोषणा
दिग्दर्शक अॅटली (Atlee Kumar) हे दक्षिणेतील सुपरस्टार दिग्दर्शकांपैकी एक आहेत. अॅक्शनपासून इमोशन आणि रोमान्सपर्यंत सर्व काही त्याच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. अॅटलीने अलीकडेच शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट जवान(Jawan)मधून दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या अॅटली जवानच्या सुपर यशाचा आनंद घेत आहेत. या सगळ्यामध्ये अॅटलीने शाहरुख खान आणि थलपती विजयसोबतच्या त्याच्या टू हिरो प्रोजेक्टची हिंट देऊन चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. मात्र, त्याने त्याच्या पुढील चित्रपटाची अधिक माहिती शेअर केलेली नाही.
अॅटलीने शेअर केले की तो एका स्क्रिप्टवर काम करत आहेत जे या पॉवरहाऊस प्रतिभांना एकत्र आणेल. अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली दोन मोठे कलाकार एकत्र येण्याच्या शक्यतेने चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत उत्सुकता वाढली आहे. लोकप्रिय तमीळ टीव्ही प्रेझेंटर आणि यूट्यूबर गोपीनाथ यांच्याशी बोलताना अॅटलीने खुलासा केला की त्यांनी विजयला फोन केला होता आणि त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते. विजयने तिथे उपस्थित राहण्याची खात्री केली. विजय पार्टीत आल्यावर शाहरुख आणि विजय आपापसात बोलले आणि मग अॅटलीला बोलावले. यानंतर शाहरुखने दिग्दर्शकाला सांगितले की, दोन नायकांना घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार केला तर ते दोघेही त्यासाठी तयार आहेत. याला विजयनेही होकार दिला आणि म्हणाला, 'अमा पा,' म्हणून मी यावर काम करत आहे. हा माझा पुढचा चित्रपट असू शकतो. त्याची स्क्रिप्ट मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. पाहत राहा."
अॅटलीचा दिग्दर्शनाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे प्रभावी
अॅटलीचा दिग्दर्शनाचा ट्रॅक रेकॉर्ड खूप मजबूत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत राजा रानी, थेरी, मर्सल, बिगिल आणि अलीकडेच शाहरुख खान स्टारर जवान यासह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. सध्या शाहरुखच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात ६४० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर ११४० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.