Shah Rukh Khan and Atlee's film Jawan Teaser : आरारा…रा..रा..खतरनाक...! शाहरूख खानच्या ‘जवान’चा टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:04 PM2022-06-03T15:04:20+5:302022-06-03T15:09:38+5:30

 Shah Rukh Khan and Atlee's film Jawan Teaser : गेल्या वर्षभरापासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती. एटली कुमार व शाहरूख खान या जोडीच्या आगामी सिनेमाचं नाव ‘जवान’ असं आहे आणि आता या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.

 ShahRukh Khan and Atlee's film Jawan Teaser OUT |  Shah Rukh Khan and Atlee's film Jawan Teaser : आरारा…रा..रा..खतरनाक...! शाहरूख खानच्या ‘जवान’चा टीझर पाहिलात का?

 Shah Rukh Khan and Atlee's film Jawan Teaser : आरारा…रा..रा..खतरनाक...! शाहरूख खानच्या ‘जवान’चा टीझर पाहिलात का?

googlenewsNext

 Shah Rukh Khan and Atlee's filmJawan: किंगखान शाहरूख खानचा ( Shah Rukh Khan ) ‘पठान’ येतोय. राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. याशिवाय साऊथचा दिग्गज दिग्दर्शक एटली कुमारचा एक सिनेमाही शाहरूखने साईन केला होता. गेल्या वर्षभरापासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती. सिनेमा साईन केला हे कन्फर्म होतं. पण या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात होतं. अखेर त्याचाही खुलासा झालाये. होय, एटली कुमार व शाहरूख खान या जोडीच्या आगामी सिनेमाचं नाव ‘जवान’ असं आहे आणि आता या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.

‘जवान’च्या टीझरमधील शाहरूखचा लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. जवान बनलेला शाहरूख एकदम ‘खतरनाक’ लुकमध्ये दिसतोय. पडद्यावर कायम लव्हर बॉय व रोमॅन्टिक हिरो बनणाऱ्या शाहरूखचा असा अंदाज तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल.
टीझरमध्ये शाहरूख जखमी दिसतोय. त्याच्या पूर्ण चेहºयावर, डोक्यावर, हातावर पट्टी बांधलेली आहे. हा टीझर पाहिल्यानंतर शाहरूखचे चाहते क्रेझी झाले आहेत. 

‘जवान’ हा एक अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा आहे. 2 जून 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम व कन्नड अशा भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याआधी 2023 च्या जानेवारीत शाहरूखचा ‘पठान’ हा सिनेमा रिलीज होतोय. म्हणजेच 2023 या वर्षात शाहरूख धमाका करणार आहे.

डबल रोलमध्ये दिसणार शाहरूख?
चर्चा खरी मानाल तर ‘जवान’ या चित्रपटात शाहरूख डबल रोलमध्ये दिसणार आहे. यात साऊथ अभिनेत्री नयनतारा इव्हेस्टिगेटिव्ह आॅफिसरची भूमिका साकारणार आहे. सान्या मल्होत्राही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.  , 

Web Title:  ShahRukh Khan and Atlee's film Jawan Teaser OUT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.