एशियाच्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत शाहरुख आणि ऐश्वर्याचे नाव सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:25 PM2018-09-29T16:25:17+5:302018-09-29T16:32:22+5:30

किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एशियाच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील झाले आहे. शाहरुख आणि ऐश्वर्याने 'ऐशियन जियोग्राफिक'ने मॅगझीन सादर केलेल्या 100 एशियाच्या प्रभावशाली लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे.   

Shahrukh and aishwarya in the list of Most impressive personality in asia | एशियाच्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत शाहरुख आणि ऐश्वर्याचे नाव सामील

एशियाच्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत शाहरुख आणि ऐश्वर्याचे नाव सामील

googlenewsNext
ठळक मुद्देमॅगझीनच्या कव्हर पेजवर ऐश्वर्या आणि शाहरुख खानला जागा देण्यात आली आहे एशियाच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील झाले आहे

किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एशियाच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील झाले आहे. शाहरुख आणि ऐश्वर्याने 'ऐशियन जियोग्राफिक'ने मॅगझीन सादर केलेल्या 100 एशियाच्या प्रभावशाली लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे.   


मॅगझीनने या दोन्ही कलाकारांना मॅगझीनच्या कव्हर पेजवर सुद्धा जागा दिली आहे. ऐश्वर्या आणि शाहरुख असे दोघेचे नाहीत ज्यांची नाव या यादीत आहेत. तर यांच्याशिवाय सचिन तेंडुलकर. मुकेश अंबानी, अमर्त्य सेन आणि अरुंधती रॉय यांच्या नावाचा देखील या यादीत समावेश आहे.  


शाहरुखच्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर तो लवकरच ''झिरो'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा व कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात शाहरूख बुटक्या व्यक्तीच्या रुपात दिसणार आहे. या  सिनेमातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.शाहरूखसारखा उंचपुरा अभिनेता बुटक्या व्यक्तिची भूमिका कशी साकारू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. पण याचे उत्तर द्यायचे झाल्यास केवळ एकच आहे. ते म्हणजे, स्पेशल इफेक्ट्स. होय, या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी अतिशय अ‍ॅडव्हान्स व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला गेला आणि हे बनवायला दोन वर्षे खर्ची घालावी लागलीत.  ऐश्वर्याबाबत बोलायचे झाले तर ती अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' या सिनेमात कॅमियो करताना दिसू शकते. 

Web Title: Shahrukh and aishwarya in the list of Most impressive personality in asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.