उणिवा राहू नये म्हणून शाहिद घेतोय तलवारबाजीचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 22:01 IST2016-12-23T22:01:38+5:302016-12-23T22:01:38+5:30
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात साकारण्यात येणाºया दृश्यात कोणतिही कमतरता ...

उणिवा राहू नये म्हणून शाहिद घेतोय तलवारबाजीचे प्रशिक्षण
‘पद्मावती’ या चित्रपटात शाहिद कपूर राजा रतन सिंग ही भूमिका साकारत आहे. राजपूत राजाच्या भूमिकेसाठी त्याने आपला लूकमध्ये बदल केले आहेत. हा चित्रपटाची पाश्वभूमी ऐतिहासिक असल्याने त्यात तलवारबाजी व लढाईचे दृश्ये असतील. यामुळेच अभिनेता शाहीद कपूर आपली भूमिका जिवंत वाटावी, यासाठी तलवारबाजीचे धडे घेत आहे. आपला अभिनयात जिवंतपणा वाटावा अशी इच्छा बाळगून तो तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत असला तरी यामागील गुपित काही औरच असल्याचे कळते. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत त्याचा मुकाबला होणार आहे. यामुळे तो तलवारबाजी व घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत आहे. आपल्या अभिनयात कोणताही कसूर त्याला ठेवायचा नाही अशी माहिती पद्मावतीच्या सेटवरील सूत्रांनी दिली.
शाहिद सध्या पद्मावतीचे शूटिंग करीत आहे. तो रात्री सेटवर पोहचतो व दिवसा तलवारबाजी व घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. शाहिद या चित्रपटासाठी कठोर मेहनत घेण्यामागेचे आणखी एक कारण म्हणजे आधी रणवीर साकारत असलेली अलाउद्दीन खिलजी ही भूमिका तो साकारणार होता. मात्र रणवीरने या अलाउद्दीनच्या भूमिकेसाठी आग्रह धरल्याने त्याला राजा रतन सिंग ही भूमिका साकारावी लागत आहे. ‘पद्मावती’मध्ये शाहिद सोबत रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत.
विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी ‘रंगून’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो कंगना रानौत व सैफ अली खानच्या अपोझिट दिसणार आहे.