शाहीद-मीरा मिशासह व्हॅकेशनवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:56 IST2016-10-12T14:06:52+5:302016-10-17T12:56:14+5:30

संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’मध्ये शाहीद कपूर दिसणार अशी खबर आहे. खबर यासाठी की, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. ...

Shahid-Meera with mustache on whack! | शाहीद-मीरा मिशासह व्हॅकेशनवर!

शाहीद-मीरा मिशासह व्हॅकेशनवर!

ong>संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’मध्ये शाहीद कपूर दिसणार अशी खबर आहे. खबर यासाठी की, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ही खबर खरी असेल तर या चित्रपटाच्या शूटींगपूर्वी शाहीद संपूर्ण कुटुंबासह सुटीवर गेला आहे. कालपरवा शाहीद पत्नी मीरा व मुलगी मीशा या दोघींसह मुंबई विमानतळावर दिसला.

गत महिन्यात शाहीदला कन्यारत्नाचा(शाहीदने आपल्या मुलीचे नाव मीशा असे ठेवले आहे ) लाभ झाला. सध्या शाहीद मीशाच्या संगोपनात व्यस्त आहे. काही महिन्यांपूर्वी शाहीदने रंगूनचे शूटिंग संपवले. तेव्हापासूनचा आपला संपूर्ण वेळ त्याने मीशासाठी राखून ठेवला होता. पण लवकरच शाहीद  ‘पद्मावती’मध्ये व्यस्त होणार आहे. तत्पूर्वी कुटुंबाला संपूर्ण वेळ देता यावा म्हणून त्याने हॉलीडेचा प्लान बनवला असल्याचे मानले जात आहे.
 
मुंबई विमानतळावर शाहीद ‘केअरिंग पापा’च्या रूपात पहायला मिळाला.  मीशाला कॅमेºयाच्या लाईट्सपासून वाचवण्यासाठी तो धडपडताना दिसला. इतका की, एकदाही त्याने मीशाचा चेहरा कॅमेºयांसमोर येऊ दिला नाही. 

शाहीदचा आगामी चित्रपट ‘रंगून’ फ्रेबुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. यात तो सैफ अली खान व कंगना रानौतसोबत दिसेल.  





Web Title: Shahid-Meera with mustache on whack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.