सावत्र बहीण सना कपूरसोबत असे काहीसे आहे शाहिद कपूरचे नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 14:01 IST2018-05-15T06:10:09+5:302018-05-15T14:01:41+5:30

'शानदार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी सना कपूर लवकरच 'खजूर पे अटके' चित्रपटात दिसणार आहे. शानदार चित्रपटात सनासोबत भाऊ शाहिद ...

Shahid Kapoor's relationship with step sister Sana Kapoor is like this | सावत्र बहीण सना कपूरसोबत असे काहीसे आहे शाहिद कपूरचे नातं

सावत्र बहीण सना कपूरसोबत असे काहीसे आहे शाहिद कपूरचे नातं

'
;शानदार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी सना कपूर लवकरच 'खजूर पे अटके' चित्रपटात दिसणार आहे. शानदार चित्रपटात सनासोबत भाऊ शाहिद कपूरसुद्धा होता. याशिवाय आलियासुद्धा या चित्रपटाचा भाग होती. मात्र तरीही या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा काही आपली कमाल दाखवू शकला नव्हता. आता पुन्हा एकदा सना चर्चेत आली आहे. सनाचे म्हणणे आहे की, ती खूप भाग्यवान आहे की तिला शाहिदसारखा प्रेम करणारा भाऊ मिळाला आहे.    

अभिनेता शाहिद कपूरची बहीण सना कपूरचे म्हणणे आहे की शाहिद कपूरसारखा काळजी घेणारा आणि प्रेम करणारा स्वत:ला नशिबवान मानते. शानदार चित्रपटातून वडिल पकंज कपूर आणि भाऊ शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या सनाने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली,'' शाहिद सारखा भाऊ असल्याने मी स्वत:ला लक्की समजते. आमच्या दोघांच्या वयामध्ये बरेच अंतर आहे. त्याने मला त्याच्या डोळ्यासमोर मोठे होताना बघितले आहे. त्यामुळे तो माझी खूप काळजी घेतो.''

पुढे ती म्हणाली, माझ्या कुटुंबातील शाहिद त्या सदस्यापैकी एक आहे ज्याच्याशी मी कधीही बोलू शकते आणि अशा गोष्टी शेअर करु शकते ज्या मी आई-वडिलांशी बोलू शकत नाही. त्यामुळे तो भाऊ असण्यासोबत माझा मित्रदेखील आहे. तो प्रेम करणाऱ्या भावांमधला आहे. सनाचे हे वक्तव्य ऐकून शाहिद ही काहीसा भावनिक झाला आहे. सनाचा आगामी चित्रपट 'खजूर पे अटके' येत्या 18 मे रोजी रिलीज होणार आहे. 

ALSO READ :  शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी पुन्हा एकदा हलणार पळणा!

शाहिद ही सध्या त्याचा आगामी चित्रपट बत्ती गुल मीटर चालू’ च्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते.  श्रद्धा यात एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलताना दिसणार आहे. श्रीनारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट यावर्षी ३१ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Shahid Kapoor's relationship with step sister Sana Kapoor is like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.