​शाहिद कपूरमुळे ‘पद्मावती’चा खोळंबा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 15:40 IST2017-06-28T10:10:56+5:302017-06-28T15:40:56+5:30

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’ पाहण्यास आपण सगळेच उत्सुक आहात. पण ‘पद्मावती’च्या मार्गात अनेक एक ना अनेक अडचणी वाढून ठेवल्या ...

Shahid Kapoor's 'Padmavati' detention !! | ​शाहिद कपूरमुळे ‘पद्मावती’चा खोळंबा!!

​शाहिद कपूरमुळे ‘पद्मावती’चा खोळंबा!!

जय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’ पाहण्यास आपण सगळेच उत्सुक आहात. पण ‘पद्मावती’च्या मार्गात अनेक एक ना अनेक अडचणी वाढून ठेवल्या आहेत. 
‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत, आधी या चित्रपटाला विरोध झाला. त्याचा परिणाम म्हणजे,गत जानेवारीच्या अखेरिस राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे  ‘पद्मावती’चे शूटींग सुरु असताना करणी सेनेने याठिकाणी धिंगाणा घातला. या प्रकारानंतर भन्साळींनी कोल्हापुरात‘पद्मावती’चा सेट उभारला गेला. पण काही महिन्यांपूर्वी  अज्ञात व्यक्तिंनी या सेटची तोडफोड करत त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. या आगीत सेटचे बरेच नुकसान झाल्याने भन्साळींना बºयाच अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे ‘पद्मावती’चे शूटींग बरेच लांबले. अर्थात टीमच्या अथक प्रयत्नांनंतर ते पूर्ववत झाले खरे. पण आता भन्साळींसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. होय, आता शाहिद कपूरमुळे ‘पद्मावती’चे शूटींग लांबत असल्याची खबर आहे. शाहिद या चित्रपटात पद्मावतीचा पती राजा रतन सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ALSO READ : ​स्वत:चे घर सोडून शाहिद कपूर का राहतोय भाड्याच्या हॉटेलमध्ये !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’त शाहीद कपूर व रणवीर सिंह यांचा एक एकत्र सीन आहे. दोघेही लढाईत परस्परांपुढे उभे ठाकतात, असा हा सीन आहे. निश्चितपणे या सीनसाठी एका योद्धयासारखी कसलेली बॉडी हवी. रणवीरचा बॉडी शेप यासाठी अगदी परफेक्ट आहे. पण शाहिद मात्र या सीनच्या चौकटीत फिट बसत नाही. या सीनसाठी हवी तशी परफेक्ट बॉडी शाहिदची नाही. त्यामुळेच या सीनचे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे. म्हणजेच आधी शाहिदला तसा बॉडी शेप मिळवावा लागणार आहे, त्यानंतर कुठे हा सीन शूट होणार आहे. म्हणूनच शाहिद सध्या जिममध्ये बराच घाम गाळताना दिसतोय.

Web Title: Shahid Kapoor's 'Padmavati' detention !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.