OMG ! ‘रंगून’मधील कंगना राणौतसोबतच्या त्या किसींग सीनबद्दल हे काय बोलून गेला शाहिद कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 11:04 IST2019-06-18T10:13:42+5:302019-06-18T11:04:45+5:30

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगून’ या चित्रपटात शाहिद कपूर व कंगना राणौतने पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट कंगना व शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा होता. पण या चित्रपटातील एक किसींग सीन चांगलाच गाजला होता.

shahid kapoor tells about the kissing scene with kangana ranaut in rangoon | OMG ! ‘रंगून’मधील कंगना राणौतसोबतच्या त्या किसींग सीनबद्दल हे काय बोलून गेला शाहिद कपूर?

OMG ! ‘रंगून’मधील कंगना राणौतसोबतच्या त्या किसींग सीनबद्दल हे काय बोलून गेला शाहिद कपूर?

ठळक मुद्देतूर्तास शाहिद कपूर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.‘कबीर सिंग’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगून’ या चित्रपटात शाहिद कपूरकंगना राणौतने पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट कंगना व शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा होता. पण या चित्रपटातील एक किसींग सीन चांगलाच गाजला होता. या सीनमध्ये दोघेही चिखलाने माखलेले होते.
हा सीन पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, शाहिद कपूरची ताजी मुलाखत. होय, अलीकडे नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये शाहिद या सीनवर बोलला. ‘रंगून’मधील या सीनमधील सर्वात खराब भाग कोणता होता? असा प्रश्न नेहाने शाहिदला केला. यावर शाहिदने जे उत्तर दिले ते ऐकून नेहा सुद्धा अवाक् झाली.

‘त्या सीनबद्दल मला काहीही आठवत नाहीये. मी ब्लँक झालोय. चिखलातील सीन होता, त्यामुळे  keechad-y होता,’ असे उत्तर शाहिदने दिले.
तुम्हाला ठाऊक आहेच की, शाहिद व कंगनामधील संबंध फार काही चांगले नाहीत. यापूर्वी एका मुलाखतीत कंगनाही या किसींग सीनबद्दल असेच काही बोलली होती. ‘रंगून’च्या सेटवर शाहिदसोबत एकच कॉटेज शेअर करणे एका वाईट स्वप्नासारखे होते. त्याच्यासोबतचा किसींग सीन चित्रीत करणे तर अतिशय घाणेरडे होते, असे कंगना म्हणाली होती. तेव्हापासून कंगना व शाहिद यांच्यात ३६ चा आकडा आहे.


तूर्तास शाहिद कपूर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.‘कबीर सिंग’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. स्वभावाने अतिशय रागीट, शीर्घकोपी असलेल्या या कबीर सिंगचा प्रेमभंग होतो आणि तो दारुच्या आहारी जातो, अशी थोडक्यात या सिनेमाची कथा आहे. संदीप वांगा दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूरसह कियारा अडवाणी, सुरेश ओबेरॉय आणि अर्जुन बाजवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: shahid kapoor tells about the kissing scene with kangana ranaut in rangoon