एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरबद्दल शाहिद कपूर म्हणाला असं काही, जे ऐकून तुम्ही व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 15:12 IST2019-06-12T15:12:38+5:302019-06-12T15:12:58+5:30
शाहिद कपूर व करीना कपूरच्या ब्रेकअपनंतर एकमेकांबद्दल बोलणे टाळताना दिसतात. मात्र नुकतेच शाहिद कपूरने आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल एका मुलाखतीत बोलला आहे.

एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरबद्दल शाहिद कपूर म्हणाला असं काही, जे ऐकून तुम्ही व्हाल हैराण
शाहिद कपूर व कियारा आडवाणी त्यांच्या आगामी चित्रपट कबीर सिंगच्या प्रमोशनसाठी नेहा धुपियाचा टॉक शोमध्ये गेले होते. यावेळी तिथे शाहिदने आपल्या करियरसोबत आपल्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासा केला आहे.
शाहिद कपूर नेहमीच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने कधी कोणती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला नाही. शाहिद व करीना यांची लव्ह स्टोरी खूप गाजली होती. ही लव्ह स्टोरी चार वर्षे चालल्यानंतर शेवटी त्यांचे ब्रेकअप झाले. करीना व्यतिरिक्त शाहिद आणि प्रियंकाची लव्ह स्टोरीदेखील लाईमलाइटमध्ये होती.
नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये शाहिद कपूरने एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर व प्रियंका चोप्राबद्दल स्टेटमेंट केले. शाहिद म्हणाला की, करीना माझ्या लक्षात नाही, खूप कालावधी लोटला आहे. करीना कपूर खानने तर तिच्या लग्नातही मला बोलवले नाही. तर प्रियंकाबद्दल त्याने सांगितले की, प्रियंकाने मला मुंबईतील तिच्या रिसेप्शनला बोलवले होते.
शाहिद कपूरच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर लवकरच तो कबीर सिंग चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे.
या चित्रपटात शाहिद एका दारूच्या व्यसनात अधीन झालेल्या कबीर सिंगची भूमिका साकारत आहे. कबीर सिंग चित्रपटाचा ट्रेलर व गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे.