​शाहिद कपूर म्हणतो, ‘रंगून’चा नवाब मलिक सर्वाधिक साहसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 17:44 IST2017-02-17T12:14:20+5:302017-02-17T17:44:20+5:30

विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी रंगून या चित्रपटातून युद्ध व प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात ब्रिटीश सेनेतील एका सैनिकाची ...

Shahid Kapoor says Nawab Malik is the most courageous of Rangoon | ​शाहिद कपूर म्हणतो, ‘रंगून’चा नवाब मलिक सर्वाधिक साहसी

​शाहिद कपूर म्हणतो, ‘रंगून’चा नवाब मलिक सर्वाधिक साहसी

शाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी रंगून या चित्रपटातून युद्ध व प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात ब्रिटीश सेनेतील एका सैनिकाची भूमिका अभिनेता शाहिद कपूर साकारत आहे. आपल्या या भूमिकेबद्दल तो कमालीचा उत्सुक आहे. आतापर्यंत मी साकारलेल्या चित्रपटांमधील ही सर्वांत साहसिक भूमिक ा आहे असे त्याने याने सांगितले. 

शाहिद क पूरने रंगूनमधील आपल्या भूमिकेचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, मी नवाब मलिक ही भूमिका साकारण्यापूर्वी विविध चरित्रे साकारली आहेत. यात टॉमी सिंह (उडता पंजाब), चार्ली-गुड्डू (कमिने) आणि हैदर (हैदर)पासून वेगळी आहेत. यामुळेच मी ही भूमिका साकारली. विशाल सरने (विशाल भारद्वाज) मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांचा प्रस्ताव दिला आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांची तुलना केल्यास नवाब मलिक हा सर्वांत साहसिक आहे. तो कर्तव्यपरायण आणि देशभक्त सैनिक आहे. त्याची भूमिका माझ्यासाठी प्रेरणादायी आहेच. ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. 



रंगूनमध्ये असा कालखंड दाखविण्यात आला आहे, जेव्हा भारतात राजकीय उलथापालथ सुरू होती. या चित्रपटातील भूमिकेला मानसिकरित्या समजून घेण्यासाठी काय करावे लागले याविषयी शाहिद म्हणाला, त्यावेळी देशात स्वातंत्र मिळावे ही भावना प्रबळ होती. अशा वेळी नवाब मलिक ब्रिटीश सेनेत काम करीत असल्याने भावनिक द्वंदाचा सामना करीत असल्याचे दिसेल. 

वडील झाल्यानंतर त्याच्यात कोणता बदल झाला यावर शाहिद म्हणाला, माझ्यात बदल झालाच आहे. आता मी चित्रपटांची निवड करताना अधिक जबाबदार झालो असल्याचे मला वाटते. शाहिद कपूर, कंगना राणौत व सैफ अली खान यांच्या भूमिका असलेला रंगून हा चित्रपट २४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. प्रेम व युद्ध या दोन गोष्टी एकाच वेळी मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटातून केला आहे. 

Web Title: Shahid Kapoor says Nawab Malik is the most courageous of Rangoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.