ऐश्वर्याच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर होता शाहीद कपूर, म्हणाला, 'तो सर्वात वाईट दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 11:18 IST2023-06-08T11:17:10+5:302023-06-08T11:18:20+5:30

त्याने अभिनय सुरु करण्यापूर्वी सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे.

shahid kapoor says it was bad day when he worked as a background dancer in taal film | ऐश्वर्याच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर होता शाहीद कपूर, म्हणाला, 'तो सर्वात वाईट दिवस..."

ऐश्वर्याच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर होता शाहीद कपूर, म्हणाला, 'तो सर्वात वाईट दिवस..."

अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. 'इश्क विश्क' सिनेमातून पदार्पण करणाऱ्या शाहीदने नंतर 'विवाह', 'दिल मांगे मोर', 'जब वी मेट' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र सिनेमात येण्यापूर्वी शाहीदनेही खूप स्ट्रगल केला आहे. त्याने अभिनय सुरु करण्यापूर्वी सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. ऐश्वर्या रॉयचा सुपरहिट सिनेमा 'ताल'  मधील एका गाण्यात चो बॅकग्राऊंड डान्सर होता. मात्र शाहीद या दिवसाला सर्वात वाईट दिवस असल्याचं सांगतो. याचं कारण त्याने एका मुलाखतीत सांगितलं.

1999 साली आलेला 'ताल' (Taal) सिनेमा गाण्यांमुळे प्रचंड हिट झाला होता. यामध्ये ऐश्वर्या रायवर (Aishwarya Rai) चित्रित झालेल्या 'कही आग लगे लग जावे' या गाण्यात शाहीद कपूरने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. शाहीद प्रसिद्ध अभिनेता झाल्यावर गाण्यातील त्याचा बॅकग्राऊंडला डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ती आठवण सांगताना शाहीद कपूरने मात्र तो आयुष्यातील वाईट दिवस होता असा खुलासा केला. 

शाहीद म्हणाला, "त्या दिवशी शूटिंगला जाताना माझा अपघात झाला होता. मी बाईकवरुन जात होतो. माझी अवस्था खूप खराब झाली होती. मी सेटवर पोहोचलो तेव्हा खूप घाबरलो होतो. पण नंतर मला एक खूप छान शॉट मिळाला आणि मी खूश झालो."

तो पुढे म्हणाला, "मी बाईकवरुन पडलो तेव्हा मला काही समजतंच नव्हतं नक्की झालं काय. मी त्या दिवसाला नेहमी वाईट आणि चांगला दिवस म्हणून लक्षात ठेवले." शाहीदने याशिवाय सुपरहिट 'दिल तो पागल है' सिनेमातही बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. या शूटवेळीही तो खूप घाबरला होता.

शाहीद कपूरची 'फर्जी' ही वेबसिरीज खूप गाजली. चाहत्यांना याच्या दुसऱ्या पार्टची उत्सुकता आहे. तर आता त्याची 'ब्लडी डॅडी' ही सिरीज लवकरच रिलीज होणार आहे. 

Web Title: shahid kapoor says it was bad day when he worked as a background dancer in taal film