Farzi 2 : 'फर्जी' चा दुसरा भाग कधी रिलीज होणार ? शाहीद कपूरनेच दिलं उत्तर; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 08:58 IST2023-03-01T08:33:12+5:302023-03-01T08:58:10+5:30

'फर्जी' सिरीज पाहिली का? सध्या सगळीकडे हाच प्रश्न विचारला जातोय.

shahid kapoor reveals farzi season 2 will be coming but it will take 2 years | Farzi 2 : 'फर्जी' चा दुसरा भाग कधी रिलीज होणार ? शाहीद कपूरनेच दिलं उत्तर; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Farzi 2 : 'फर्जी' चा दुसरा भाग कधी रिलीज होणार ? शाहीद कपूरनेच दिलं उत्तर; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Farzi 2 : 'फर्जी' सिरीज पाहिली का? सध्या सगळीकडे हाच प्रश्न विचारला जातोय. अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Amazon Prime) आलेली फर्जी सिरीज चांगलीच गाजत आहे. अभिनेता शाहीद कपूरने (Shahid Kapoor) या सिरीजमधून ओटीटी माध्यमात प्रवेश केला आहे. 'फर्जी' सिरीजची गोष्ट, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय सगळंच जुळून आलंय. म्हणून ही सिरीज अल्पावधीतच चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. आता 'फर्जी' चा दुसरा भाग कधी येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर नुकतेच शाहीद कपूरने यावर उत्तर दिले आहे.

अभिनेता शाहीद कपूर काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड शो मध्ये हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी त्याने संवाद साधला. मुव्ही टॉकिज यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत 'फर्जी'चा दुसरा सिझन कधी रिलीज होणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर शाहीद म्हणाला, 'फर्जी सिझन २ नक्कीच येणार. मात्र या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो. पोस्ट प्रोडक्शनसाठीच एक वर्ष जाते. ३५ ते ३० भाषांमध्ये तो डब केला जातो. २०० देशांमध्ये प्रदर्शित होतो. जेव्हा शूटिंग होईल त्याच्यानंतर दीड दोन वर्षांनी सिरीज रिलीज होईल. तर फर्जी २ रिलीज होण्यासाठी दीड दोन वर्ष तर नक्कीच आहेत.'

'फर्जी' ही सिरीज नकली नोटांच्या धंद्यावर आधारित आहे. राज आणि डीके (Raj & DK) या जोडीने ही क्राईम थ्रिलर सिरीज दिग्दर्शित केली आहे. यामध्ये शाहीद कपूरने 'सनी' ची मुख्य भूमिका साकारली आहे. सनी आपल्या आजोबांची प्रिंटिंग प्रेस बंद पडल्यानंतर नकली नोटांचा धंदा सुरु करतो. शाहीद कपूरसोबत सिरीज मध्ये साऊथ अभिनेता विजय सेतुपती (Vijay Setupathi) आहे. त्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे. शिवाय अमोल पालेकर , भुवन अरोरा, केके मेनन, राशी खन्ना यांचीही भूमिका आहे.

Web Title: shahid kapoor reveals farzi season 2 will be coming but it will take 2 years