शाहिद कपूरवर एकतर्फी प्रेम करायची ‘ही’ अभिनेत्री; लोकांना सांगायची ‘तो माझा पती आहे’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:27 IST2017-09-27T08:31:17+5:302017-09-27T14:27:47+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर विवाहित असून, त्याला एक गोंडस मुलगी आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा मुली शाहिदवर ...

Shahid Kapoor is the only one to love; Telling people to 'he is my husband'! | शाहिद कपूरवर एकतर्फी प्रेम करायची ‘ही’ अभिनेत्री; लोकांना सांगायची ‘तो माझा पती आहे’!

शाहिद कपूरवर एकतर्फी प्रेम करायची ‘ही’ अभिनेत्री; लोकांना सांगायची ‘तो माझा पती आहे’!

लिवूड अभिनेता शाहिद कपूर विवाहित असून, त्याला एक गोंडस मुलगी आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा मुली शाहिदवर जीव ओवाळून टाकायच्या. अर्थात आजही शाहिदवर फिदा होणाºयांची संख्या कमी नाही. वास्तविक लग्नाअगोदर शाहिदचे करिना कपूर, विद्या बालन, प्रियंका चोपडा यांसारख्या अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले. त्याकाळी शाहिद चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाइफमुळेच अधिक चर्चेत असायचा. मात्र त्याहीपेक्षा त्याच्यासोबत घडलेली एक घटना अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. होय, शाहिदच्या लाइफमध्ये एक अभिनेत्री अशी होती, जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. तिचे प्रेम लपूनछपून नव्हते, तर जाहीरपणे ती शाहिदवर असलेल्या प्रेमाचा स्वीकार करायची. एवढेच नव्हे तर ती बिंधास्तपणे कुठेही शाहिद माझा पती असल्याचे सांगायची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही अभिनेत्री कोण असेल? तर ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून, बॉलिवूडचे एकेकाळचे सुपरस्टार राजकुमार यांची मुलगी वास्तविकता पंडित आहे. 

वास्तविकता पंडित आणि शाहिद एकेकाळी खूप चांगले मित्र होते. वास्तविकताने १९९६ मध्ये ‘ऐसी भी क्या जल्दी है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मात्र तिचा हा चित्रपट फारसा चालला नव्हता. त्यामुळे तिचे बॉलिवूड करियर सुरू होण्याअगोदरच संपले. वास्तविकता शाहिदवर जीवापाड प्रेम करीत होती. मात्र शाहिद तिला केवळ एक चांगली मैत्रीण समजायचा. त्यामुळे वास्तविकताचे प्रेम एकतर्फी बनले होते. ती शाहिदला विसरायला तयार नव्हती. ती शाहिदचा सातत्याने पाठलाग करायची. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु जेव्हा ती शाहिदला पती म्हणून संबोधायला लागली, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ती बिंधास्तपणे कुठेही शाहिदला पती म्हणून बोलवायची. त्यामुळे लोकांमध्ये शाहिद आणि वास्तविकता या जोडीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या दोघांनी लग्न तर केले नाही ना? अशीही चर्चा रंगू लागली. 



मात्र, वास्तविकताच्या या वागण्यामुळे शाहिद खूपच संतापला होता. त्याने तिला समजावून सांगितल्यानंतरही तिच्यात कुठलाच बदल होत नव्हता. अखेर शाहिदने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. वास्तविकताच्या या सर्व प्रकारामुळे केवळ शाहिदच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील मंडळीही त्रस्त झाली होती. त्यांना असे वाटायचे की, ती पब्लिसिटीकरिता हा सर्व प्रकार करीत असावी. परंतु ती शाहिदवर खºया अर्थाने प्रेम करायची. अर्थात तिचे हे प्रेम एकतर्फी होते. असो, शाहिदच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, तो सध्या संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात काम करीत आहे. चित्रपटात तो महारावल रतन सिंहची भूमिका साकारत आहे. 

Web Title: Shahid Kapoor is the only one to love; Telling people to 'he is my husband'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.