शाहीद कपूर मायकेल जॅक्सनचा ‘क्रेझी’ फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 15:51 IST2016-06-14T10:21:10+5:302016-06-14T15:51:10+5:30

अभिनेता शाहीद कपूरने आपण मायकेल जॅक्सनला ‘लाईव्ह’ पाहण्यासाठी किती उत्सुक होतो आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या, याची माहिती दिली ...

Shahid Kapoor Michael Jackson's 'Crazy' Fan | शाहीद कपूर मायकेल जॅक्सनचा ‘क्रेझी’ फॅन

शाहीद कपूर मायकेल जॅक्सनचा ‘क्रेझी’ फॅन

िनेता शाहीद कपूरने आपण मायकेल जॅक्सनला ‘लाईव्ह’ पाहण्यासाठी किती उत्सुक होतो आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या, याची माहिती दिली आहे. आपल्या वाढदिवसाला भेट देण्याऐवजी मायकेल जॅक्सनला पाहण्यासाठी पैसे दे अशी विनवणी शाहीदने आईकेडे केली होती.
ही घटना सांगताना शाहीद म्हणतो, १९९५ साली मायकेल जॅक्सन येणार होता. त्यावेळी ३००० रुपये तिकीट ठेवण्यात आले होते. मी माझ्या आईला सांगितले मला पुढील पाच वर्षे कोणतेही वाढदिवसाचे गिफ्ट नको, मला मायकेलच्या कार्यक्रमाचे तिकीट हवे.’
त्यावेळी शाहीदने पॉकेट मनीच्या स्वरुपात असणारी काही रक्कम गोळा केली. आईकडून कर्ज घेतले आणि तिकीट काढले.
त्याला रॉकस्टार व्हायचे होते का, या प्रश्नावर शाहीद म्हणाला, ज्यावेळी तुम्ही स्टेजवर मोठा कलाकार पाहता, एकतर तो चित्रपट अभिनेता, संगीतकार किंवा रॉकस्टार असतो.  त्या स्टेजवर जाण्याची तुमची इच्छा असते. तुम्हालाही लोकांनी तशाचपद्धतीने मान दिला पाहिजे असे वाटते. मला वाटते प्रत्येक कलाकाराचे हे स्वप्न असते.‘
उडता पंजाब हा चित्रपट ड्रग्जच्या बाबतीत आहे. शाहीदने रॉकस्टारची भूमिका केली आहे, ज्याला ड्रगची नशा असते.






Web Title: Shahid Kapoor Michael Jackson's 'Crazy' Fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.