​शाहिद कपूरला वाटते बायकोच्या कमी वयाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 12:57 IST2017-01-02T12:57:58+5:302017-01-02T12:57:58+5:30

शाहिद कूपर आणि मीरा राजपूत यांच्या वयातील अंतर त्याच्यासाठी आजही चिंतेचे कारण आहे. हे आम्ही नाही तर खुद्द शाहिदच ...

Shahid Kapoor feels that the lack of concern for the wife is low | ​शाहिद कपूरला वाटते बायकोच्या कमी वयाची चिंता

​शाहिद कपूरला वाटते बायकोच्या कमी वयाची चिंता

हिद कूपर आणि मीरा राजपूत यांच्या वयातील अंतर त्याच्यासाठी आजही चिंतेचे कारण आहे. हे आम्ही नाही तर खुद्द शाहिदच सांगतोय. मीरा आणि त्याच्यामध्ये तब्बल १३ वर्षांचा फरक आहे. करण जोहरच्या चॅट शोवर आले असताना दोघांनी याविषयी दिलखुलासपणे चर्चा केली.

शाहिद-मीराच्या लग्नाला आता दीड वर्षे झाले असून त्यांना मिशा नावाची एक गोंडस मुलगीसुद्धा आहे. करणच्या प्रश्नांना उत्तर देताना शाहिद म्हणाला की, ‘ती माझ्याहून १३ वर्षांनी लहान आहे ही गोष्ट मला नेहमीच चिंतेत टाकते. तिला जेव्हा माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान मुलांवर क्रश होते तेव्हा मी फार जळतो. सुरुवातीला मला जेव्हा कळाले की तिचे वय के वळ २१ वर्षे आहे तेव्हा तर मी म्हटले या मुलीसोबत मी कसा लग्न करू?’

मग असे काय झाले की तो लग्नाला तयार झाला?

शाहिद आणि मीराची पहिली भेट तिच्या घरी झाली होती. एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी ते मग एका फार्म हाऊसवर गेले. यावेळी मीराने शाहिदला पहिला प्रश्न विचारला की, तु वयाने एवढ्या लहान मुलीशी का लग्न करतोय? यावर हैराण झालेल्या शाहिदनेसुद्धा असाच प्रतिप्रश्न केला. दोघांनी सुमारे सात गप्पा मारल्या.

मीराने सांगितले की, त्यावेळी मी त्याच्याविषयी असा काही विचार केला नव्हता; पण त्याला पुन्हा भेटण्याची इच्छा मला होऊ लागली. शाहिदलासुद्धा वाटले की, या अनोळखी मुलीशी तो सात तास गप्पा मारू शकतो तर यापेक्षा चांगली लाईफ पार्टनर दुसरी कोणती असू शकेल!

Meera Rajput with Shahid Kapoor
क्युट कपल : मीरा राजपूत आणि शाहिद कपूर

लग्नाची बोलणी सुरू होती तेव्हाचा एक रंजक किस्सा मीराने शेअर केला. तिच्या आईला वाटले होते की, मीरासाठी शाहिदचा लहान भाऊ रुहानचे स्थळ आले आहे. करणने जेव्हा तिला विचारले की, शाहिदच्या बहीण-भावांशी कसे नाते आहे तेव्हा ती म्हणाली, सना, इशान, रुहान माझ्याच वयाचे असल्याने मी लग्नापूर्वी केवळ त्यांच्याशीच रिलेट करायचे.

यावर लगेच शाहिद म्हणाला की, म्हणजे तु माझ्याशी रिलेट होऊ शकत नव्हती? यावर हसणाऱ्या करणलासुद्धा तो म्हणाला की, माझी जर अशी स्थिती आहे तर बघ तुला ती काय समजत असेल?

करणने उत्तर दिले की, म्हणून मी स्वत:ला तरुण राखण्यासाठी सतत तरुण मुलांमुलींसोबत राहतो. लगेच टिप्पणी करत मीरा म्हणाली की, शाहिदनेसुद्धा याच कारणामुळे माझ्यासोबत लग्न केले आहे. आता अशा टोमण्यावर बिचारा शाहिद तरी काय बोलणार?

Web Title: Shahid Kapoor feels that the lack of concern for the wife is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.