'कॉकटेल २'च्या सेटवर फुलली केमिस्ट्री! शाहिद-रश्मिका नव्या रोम-कॉम सिनेमात झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:00 IST2026-02-09T11:54:45+5:302026-02-09T12:00:02+5:30

शाहिद-रश्मिका जोडी पुन्हा जमणार!

shahid kapoor and rashmika mandanna bags one more film after cocktail 2 | 'कॉकटेल २'च्या सेटवर फुलली केमिस्ट्री! शाहिद-रश्मिका नव्या रोम-कॉम सिनेमात झळकणार

'कॉकटेल २'च्या सेटवर फुलली केमिस्ट्री! शाहिद-रश्मिका नव्या रोम-कॉम सिनेमात झळकणार

शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना आगामी 'कॉकटेल २' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून, पहिल्यांदाच ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या नव्या केमिस्ट्रीची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, आता ही जोडी केवळ एका चित्रपटापुरती मर्यादित नसून दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्येही एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

'कॉकटेल २' च्या चित्रीकरणादरम्यान शाहिद आणि रश्मिका यांच्यातील ट्युनिंग निर्मात्यांना खूप आवडले. 'व्हरायटी इंडिया'च्या वृत्तानुसार, सेटवरील त्यांचा उत्कृष्ट बाँड आणि केमिस्ट्री पाहून एका नवीन प्रोजेक्टसाठी त्यांना विचारणा करण्यात आली आहे. दोघांनीही या कल्पनेला लगेच पसंतीही दर्शवली असून पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास होकार दिला आहे.


या आगामी अनटाइटल्ड चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले, तरी हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल असे समजते. सुनील खेत्रपाल या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 'कॉकटेल २' मधील त्यांची जोडी पाहण्याआधीच दुसऱ्या चित्रपटाच्या बातमीने चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

दरम्यान, 'कॉकटेल २' हा २०१२ मध्ये आलेल्या सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या 'कॉकटेल' चित्रपटाचा सीक्वल आहे. या नव्या भागात शाहिद आणि रश्मिकासोबत क्रिती सनॉन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असून, प्रेक्षक या फ्रेश जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत.

Web Title : 'कॉकटेल 2' के सेट पर शाहिद-रश्मिका की केमिस्ट्री, नई रोम-कॉम फिल्म

Web Summary : शाहिद कपूर और रश्मिका मंदाना, 'कॉकटेल 2' की शूटिंग के दौरान अपनी केमिस्ट्री से निर्माताओं को प्रभावित किया। उन्होंने सुनील खेत्रपाल द्वारा निर्मित एक और रोमांटिक कॉमेडी साइन की है। कृति सनोन अभिनीत 'कॉकटेल 2', सितंबर 2026 में रिलीज होने की उम्मीद है।

Web Title : Shahid and Rashmika's Chemistry Sparks on 'Cocktail 2' Set, New Rom-Com

Web Summary : Shahid Kapoor and Rashmika Mandanna, filming 'Cocktail 2', impressed producers with their chemistry. They've signed on for another romantic comedy, produced by Sunil Khetarpal. 'Cocktail 2', a sequel featuring Kriti Sanon, is expected to release in September 2026.