शाहीद कपूर व मीरा राजपूत करताहेत दुसऱ्या मुलाचे प्लानिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 15:28 IST2017-07-02T09:56:41+5:302017-07-02T15:28:04+5:30
शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत ...

शाहीद कपूर व मीरा राजपूत करताहेत दुसऱ्या मुलाचे प्लानिंग!
श हिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली. अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यानंतर मीराने मीशा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मीशा हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय. तेही अगदी उत्तमरित्या.
मीशाच्या जन्मानंतर मीरा व शाहिद दोघेही करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये दिसले. या शोमध्ये मीशाच्या हजरजबाबी स्वभावाने सगळ्यांचीच मने जिंकली. यानंतर मीरा बॉलिवूड डेब्यू करणार, अशाही बातम्या आल्या. अलीकडे एका इव्हेंटमध्ये मीराने यावर चुप्पी तोडली. ती अनेक विषयावर बोलली. ‘कॉफी विद करण’मध्ये जाण्याबाबत मी कॉन्फिडंट नव्हते. पण शाहिदने मला बूस्ट अप केले. केवळ शाहिदमुळे मी या शोमध्ये नर्व्हस नव्हते. तूर्तास चित्रपटात काम करण्याचा माझा काहीही विचार नाही. अशा बातम्या कुठून येतात, हे मला कळत नाही,असे तिने यावेळी सांगितले.
करिअरबद्दल विचारले असता, मला लवकरात लवकर स्वत:ला कामात झोकून द्यायचे आहे. काही तरी क्रिएटीव्ह करण्याची योजना आहे. कामासोबतच मला कुटुंबासाठीही वेळ द्यायचा आहे. आमच्या दुस-या मुलाबद्दलही आम्ही विचार चालवला आहे, असे ती म्हणाली. म्हणजेच, मीशाला दुसरा भाऊ किंवा बहीण मिळणे जवळजवळ पक्के आहे.