कॅटने केले शाहीद-आलियाचे कौतुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 12:17 IST2016-06-18T06:47:57+5:302016-06-18T12:17:57+5:30

शाहीद कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘उडता पंजाब’ चित्रपट त्यातील तगडं कथानक आणि उत्तम परफ ॉर्मन्स यांच्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत ...

Shahid-Aliya appreciated Katrina! | कॅटने केले शाहीद-आलियाचे कौतुक !

कॅटने केले शाहीद-आलियाचे कौतुक !

हीद कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘उडता पंजाब’ चित्रपट त्यातील तगडं कथानक आणि उत्तम परफ ॉर्मन्स यांच्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. चाहत्यांबरोबरच ‘बी’ टाऊनच्या सेलिब्रिटींना देखील चित्रपटाचे आकर्षण वाटते आहे.

नुकतीच चित्रपटाची स्क्रिनिंग झाली. त्यावेळी कॅटरीना कैफ शाहीद आणि आलिया यांच्या अभिनयाने खुपच प्रभावित झाली. ती म्हणते,‘ मला वाटतं की, हा चित्रपट खरंच खुप चांगला आहे. शाहीद-आलिया यांनी खुपच उत्तम सादरीकरण केले आहे.

आलियाची भूमिका मला जास्त आवडली. चित्रपटाची कॉपी लिक झाली असली तरीही कुणीही चित्रपट घरी पाहू नये. कलाकारांनी केलेल्या अभिनयाचे कौतुक थिएटरवर जाऊन चित्रपट पाहूनच करा.’

वेल, कॅट एका कलाकाराने दुसºया कलाकाराचे एवढे तोंडभरून कौतुक करणं ही देखील खुप मोठी बाब आहे. त्यामुळे तुझेही कौतुक!

shahid

alia

Web Title: Shahid-Aliya appreciated Katrina!