शाहरूखच्या पठाणी स्टाइलवर फॅन्सच नव्हे तर हे स्टार्सही झाले फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 19:43 IST2017-01-11T19:39:46+5:302017-01-11T19:43:25+5:30

बॉलिवूडमध्ये जो फॅशन ट्रेण्ड असतो तोच फॉलो केला जातो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या शाहरूख खानचा ‘रईस’ चर्चेत असून, या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांमध्ये शाहरूखचा पठाणी लूक त्याच्या चाहत्यांना जबरदस्त भावत आहे. त्यामुळेच सध्या सर्वदूर पठाणी फॅशन फॉलो केली जात आहे.

Shah Rukh's style was not just a fancy style but it was also a studio! | शाहरूखच्या पठाणी स्टाइलवर फॅन्सच नव्हे तर हे स्टार्सही झाले फिदा!

शाहरूखच्या पठाणी स्टाइलवर फॅन्सच नव्हे तर हे स्टार्सही झाले फिदा!

लिवूडमध्ये जो फॅशन ट्रेण्ड असतो तोच फॉलो केला जातो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या शाहरूख खानचा ‘रईस’ चर्चेत असून, या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांमध्ये शाहरूखचा पठाणी लूक त्याच्या चाहत्यांना जबरदस्त भावत आहे. त्यामुळेच सध्या सर्वदूर पठाणी फॅशन फॉलो केली जात आहे. 



रईसमध्ये शाहरूख एका गॅँगस्टरची भूमिका साकारत असून, त्यासाठी तो सिनेमात पठाणी सूटमध्ये मर्दानी अंदाजात दिसत आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि काही गाणी लॉँच झाली असून, त्यातील शाहरूखचा लूक बघण्यासारखा आहे. त्याचे चाहते तर त्याच्या या लुकवर फिदा झाले असून, सध्या मार्केटमध्ये पठाणी सूट स्टाइल फॉलो केली जात असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. विशेष म्हणजे शाहरूख प्रमोशनसाठी याच लुकमध्ये फिरत असल्याने चाहते त्याच्यावर भावून जात आहेत. 



सध्या तो सलमान खान होस्ट करीत असलेल्या बिग बॉस या शोमध्ये रईसच्या प्रमोशननिमित्त येणार असून, त्याच्या या पठाणी सूटची भुरळ दस्तुरखुद्द सलमान खानलाही पडली आहे. दोघांच्या एपिसोडचा प्रमो नुकताच रिलिज करण्यात आला असून, त्यात दोघेही काळ्या रंगाच्या पठाणी सूटमध्ये दिसत आहेत. तर एका इव्हेंटमध्ये अजय देवगण पांढºया रंगाचा पठाणी सूट घालून पोहोचल्याने सध्या बॉलिवूडमध्ये पठाणी स्टाइलची चलती असल्याचे दिसून येत आहे. 



वास्तविक शाहरूख खानने बºयाचदा पठाणी सूट परिधान करून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावलेली आहे; मात्र यावेळेसचा त्याचा अंदाज काही औरच आहे. रईसमधील त्याचा गेटअप पठाणी फॅशनला संजीवनी देणारा असून, चाहते त्याच्या या नव्या अंदाजावर फिदा झाले आहेत. इंडस्ट्रीमध्येही ही स्टाइल फॉलो केली जात असल्याने सिनेमा रिलिज अगोदरच त्यातील स्टाइल हिट ठरत आहे, हे नक्की. आता स्टाईलबरोबर, सिनेमालाही प्रेक्षक दाद देतील का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: Shah Rukh's style was not just a fancy style but it was also a studio!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.