‘सर्कस’ घेऊन पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार किंगखान शाहरूख खान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:11 IST2018-09-19T14:11:07+5:302018-09-19T14:11:51+5:30
शाहरूखच्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात झाली तीच मुळी छोट्या पडद्यापासून. ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या त्याच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. या मालिकेने शाहरूखला खरी ओळख मिळवून दिली होती.

‘सर्कस’ घेऊन पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार किंगखान शाहरूख खान!
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान लवकरच ‘झीरो’ या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी गतवर्षी आॅगस्टमध्ये रिलीज झालेल्या इम्तियाज अलीच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात तो दिसणार आहे. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे, गेल्या वर्षभरापासून शाहरूख रूपेरी पडद्यावर झळकलेला नाही. साहजिकचं त्याला पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत़.शाहरूखबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ५२ वर्षांचा हा सुपरस्टार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पतरणार आहे. पण कुठल्या नव्या शोमधून नाही तर एका जुन्या गाजलेल्या शोमधून. आपण सगळेचं जाणतो की, शाहरूखच्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात झाली तीच मुळी छोट्या पडद्यापासून. ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या त्याच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. या मालिकेने शाहरूखला खरी ओळख मिळवून दिली होती. पुढे छोट्या पडद्याकडून शाहरूख मोठ्या पडद्याकडे वळला. पुढचा सगळा इतिहास आपण सगळेच जाणतोच. सांगायचे हे की, शाहरूखचा एक गाजलेला शो अर्थात ‘सर्कस’ ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे.
NOT TO BE MISSED! @iamsrk in his early avatar as #Shekharan with @renukash in #Circus a blockbuster TV show, every Saturday & Sunday at 9:30 pm ONLY on @DDNational from 22nd September. Celebrate 59 YEARS of #Doordarshanpic.twitter.com/eo86VZ8CHC
— Doordarshan National (@DDNational) September 19, 2018
दूरदर्शनने आपल्या ५९ व्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर शाहरूखची ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री ९.३० वाजता ‘सर्कस’चे प्रसारण होणार आहे.
या मालिकेत सुनील शेंडे, रेखा सहाय, रेणुका शहाणे, आशुतोष गोवारीकर हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. शाहरूखने या मालिकेत शेखरन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अजीज मिर्झा आणि कुंदन शहा दिग्दर्शित ही मालिका पाहणे शाहरूखच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक ट्रिट असणार आहे.