शाहरूख खानची प्रिंसेस सुहानाच्या या फोटोंची इंटरनेटवर धूम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 15:28 IST2018-01-04T09:58:24+5:302018-01-04T15:28:35+5:30

शाहरूख खानची लाडकी सुहाना खान काही दिवसांपूर्वीच एका नातेवाइकाच्या लग्नसमारंभात पोहोचली होती. याठिकाणचे तिचे काही फोटो समोर आले असून, सोशल मीडियावर प्रचंड पसंत केले जात आहेत.

Shah Rukh Khan's Princess Suhana's photos are on the internet! | शाहरूख खानची प्रिंसेस सुहानाच्या या फोटोंची इंटरनेटवर धूम!!

शाहरूख खानची प्रिंसेस सुहानाच्या या फोटोंची इंटरनेटवर धूम!!

हरूख खानची लाडकी लेक सुहाना खान तिच्या सुंदरतेवरून इंटरनेटवर सध्या जबरदस्त चर्चेत आहे. सुहानाचे फोटो नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असल्याने सर्वाधिक चर्चेत राहणाºया स्टारकिड्समध्ये सुहानाचे नाव घेतले जात आहे. सध्या सुहानाचे काही लेटेस्ट फोटो इंटरनेटवर धूम उडवित असून, ट्रेडिशनल लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सुहाना काही दिवसांपूर्वीच डॅड शाहरूख आणि मॉम गौरी खानसोबत त्यांच्या एका नातेवाइकाच्या लग्नात गेली होती. या लग्नात सर्वांत जास्त सुहानाच्या सौंदर्याचीच चर्चा रंगली होती. सुहानाने लग्नसमारंभात खूपच सुंदर फ्लोरल लहंगा परिधान केला होता. 
 

हा लहंगा सोहेल खानची पत्नी सीमा खानने डिझाइन केला होता. सीमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुहानाचा एक फोटो पोस्ट केला. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या व्हाइट फ्लोरल लहंग्यामध्ये सुहाना खूपच गॉर्जियस आणि वायब्रेंट दिसत आहे. या ड्रेसवर तिने घातलेली आकर्षक ज्वेलरी तिचा लूक कम्पलीट करीत आहे.’ सध्या सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे, तर आणकी काही फोटो समोर आले असून, त्यामध्ये गौरी आणि शाहरूखही दिसत आहेत. 
 

फोटोमध्ये सुहानाने हा लग्नसमारंभ चांगलाच एन्जॉय केल्याचे दिसून येते. सुहानाविषयी बोलताना शाहरूखने म्हटले होते की, सुहानाला अभिनेत्री बनायचे आहे. तिच्या अंगी चित्रपटांविषयी खूपच उत्सुकता आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीदेखील ट्विट करून म्हटले होते की, मी सुहानाचा अभिनय एका छोट्याशा व्हिडीओ क्लिपमध्ये बघितला होता. व्हिडीओ बघून हा विश्वास वाटला की, सुहाना इंडस्ट्रीमध्ये एक हिट अभिनेत्री म्हणून समोर येईल. 

Web Title: Shah Rukh Khan's Princess Suhana's photos are on the internet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.