पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी किंग खानची मोठी मदत, १ हजार ५०० कुटुंबांसाठी शाहरुख ठरला 'देवदूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:30 IST2025-09-12T13:29:27+5:302025-09-12T13:30:00+5:30

पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी शाहरुख खानने उचलले महत्त्वाचे पाऊल

Shah Rukh Khan's Meer Foundation Sends Relief Kits To 1500 Flood-hit Families In Punjab | पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी किंग खानची मोठी मदत, १ हजार ५०० कुटुंबांसाठी शाहरुख ठरला 'देवदूत'

पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी किंग खानची मोठी मदत, १ हजार ५०० कुटुंबांसाठी शाहरुख ठरला 'देवदूत'

Shah Rukh Khan Help To Families Affected In Punjab Flood: गेल्या काही आठवड्यांपासून पंजाबमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भीषण पूरसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. अशा संकटाच्या काळात मनोरंजनसृष्टीतील अनेक स्टार्स मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेता शाहरुख खान हा पूरग्रस्त कुटुंबांसाठी देवदूत ठरलाय.

स्थानिक स्वयंसेवी संस्थांशी (NGOs) हातमिळवणी करून शाहरुख खानची मीर फाउंडेशनकडून पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांना मदत करत आहे. या अंतर्गत, आवश्यक मदत किट वितरित केल्या जात आहेत, ज्यात औषधे, अन्नपदार्थ, मच्छरदाणी, ताडपत्री, फोल्डिंग बेड, कापसाचे गादे आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. अमृतसर, पटियाला, फाजिल्का आणि फिरोजपूर सारख्या जिल्ह्यांमधील एकूण १,५०० कुटुंबांपर्यंत ही मदत पोहचवली जात आहे.

किंग खानची मीर फाउंडेशन प्रामुख्याने अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करते. परंतु जेव्हा जेव्हा समाजातील कोणालाही मदतीची आवश्यकता असते, तेव्हा या संस्थेने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. कोविड-१९ दरम्यानही, मीर फाउंडेशनने ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णालयांसाठी बेड तसेच रेशन यासारख्या आवश्यक वस्तू पुरवल्या होत्या.

शाहरुख खानसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानच्या 'बीइंग ह्यूमन' संस्थेने पंजाबमध्ये पाच बचाव बोटी पाठवल्यात.  शिवाय त्याच्या बीइंग ह्यूमन या संस्थेअंतर्गत गावेदेखील दत्तक घेतली जाणार असल्याचे समोर आले आहे. तसेच अक्षय कुमारने मदतकार्यासाठी ५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यासोबतच, सोनू सूद, दिलजीत दोसांझ, शहनाज गिल, हरभजन सिंग आणि एमी विर्क यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बचाव कार्यात गुंतले आहेत.
 

Web Title: Shah Rukh Khan's Meer Foundation Sends Relief Kits To 1500 Flood-hit Families In Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.