करण जोहरने शेअर केलेल्या १८ वर्षांपूर्वीच्या फोटोत दिसतोय शाहरूख खानचा लकी चार्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 22:01 IST2017-08-30T16:31:47+5:302017-08-30T22:01:56+5:30

असाच एक फोटो पोस्ट केला असून, त्यामध्ये त्याच्या कडेवर एक छोटासा मुलगा दिसत आहे. शिवाय ‘मिस्टर इंडिया’ फेम आदित्य चोपडाही फोटोमध्ये बघावयास मिळत आहे; मात्र प्रश्न हा निर्माण होतो की, करणच्या कडेवर असलेला तो छोटा मुलगा कोण असावा ? याचाच उलगडा आम्ही करणार आहोत.

Shah Rukh Khan's Lucky Charm seen in Karan Johar's 18-year-old photo! | करण जोहरने शेअर केलेल्या १८ वर्षांपूर्वीच्या फोटोत दिसतोय शाहरूख खानचा लकी चार्म!

करण जोहरने शेअर केलेल्या १८ वर्षांपूर्वीच्या फोटोत दिसतोय शाहरूख खानचा लकी चार्म!

र्माता तथा दिग्दर्शक करण जोहर सध्या सोशल मीडियावर एका पाठोपाठ एक जुने फोटो शेअर करून आठवणींना उजाळा देत आहे. काल त्याने अभिनेत्री काजोलबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. आता त्याने पुन्हा एकदा असाच एक फोटो पोस्ट केला असून, त्यामध्ये त्याच्या कडेवर एक छोटासा मुलगा दिसत आहे. शिवाय ‘मिस्टर इंडिया’ फेम आदित्य चोपडाही फोटोमध्ये बघावयास मिळत आहे; मात्र प्रश्न हा निर्माण होतो की, करणच्या कडेवर असलेला तो छोटा मुलगा कोण असावा ? याचाच उलगडा आम्ही करणार आहोत. 

जर तुम्ही या फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की, करणच्या कडेवर असलेला तो छोट्या मुलगा दुसरा-तिसरा कोणीही नसून, शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान आहे. हा फोटो जवळपास १८ वर्षांपूर्वीचा आहे. करणने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बेस्ट फ्रेंड आदि आणि आर्यनसोबत, वेळ कसा जातो... हा फोटो १८ वर्षांपूर्वीचा आहे.’ आर्यन त्यावेळी पप्पा शाहरूखपेक्षा करणची कंपनी खूप एन्जॉय करायचा. आजही करण आर्यनला खूप जवळ करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने स्पष्ट केले होते की, जर आर्यन चित्रपटांमध्ये येऊ इच्छितो तर त्याचा बॉलिवूड डेब्यू माझ्याच चित्रपटातून करणार आहे. 
 

आर्यन सध्या विदेशात शिक्षण पूर्ण करीत आहे. त्याचबरोबर शाहरूखची मुलगी सुहाना खान हीदेखील सध्या अभिनयाच्या टिप्स फॉलो करीत असल्याचे समजते. सध्या ती करण जोहरच्या मार्गदर्शनाखालीच चित्रपटांबाबतचे बारकावे शिकत आहे. करण किंग खानच्या फॅमिलीच्या सर्वांत क्लोज आहे. शाहरूख खानची पत्नी गौरी खाननेच करणच्या जुळ्या मुलांची नर्सरी डिझाइन केली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये करण जुळ्या मुलांचा बाप बनला. त्याने नुकतेच त्याच्या मुलांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. 

त्याचबरोबर करण गेल्या काही दिवसांपासून त्याची क्लोज मैत्रीण काजोल हिच्यासोबत झालेल्या वादामुळेही चांगलाच चर्चेत आहे. सूत्रानुसार करण आता हा वाद मिटवू इच्छितो. याकरिता त्याने काजोलसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. 

Web Title: Shah Rukh Khan's Lucky Charm seen in Karan Johar's 18-year-old photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.