शाहरूख खानची लेक सुहाना न्यूयॉर्कमध्ये करतेय शूटिंग?, नवा लूक होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 12:25 IST2021-09-17T12:25:25+5:302021-09-17T12:25:52+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते.

Shah Rukh Khan's daughter Suhana is working on a project in New York ?, a new look is going viral | शाहरूख खानची लेक सुहाना न्यूयॉर्कमध्ये करतेय शूटिंग?, नवा लूक होतोय व्हायरल

शाहरूख खानची लेक सुहाना न्यूयॉर्कमध्ये करतेय शूटिंग?, नवा लूक होतोय व्हायरल

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि गौरी खान यांची लेक सुहाना खान ही लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच ती खूप चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जी खूप व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमधील सुहानाचा नवा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.

सुहाना खानने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. हा फोटो पाहून वाटत आहे की सुहाना कोणत्या तरी नव्या प्रोजेक्टचे शूटिंग करत आहे. तिच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून वाटत आहे की ती शूटिंग करते आहे.

फोटोत तिने व्हाइट रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत सुहानाने हेडशॉट आणि स्टोनस्ट्रीट स्टुडिओला टॅग केले आहे. या फोटोतील सुहानाच्या पोझने चाहत्यांचे मन जिंकले आहे.


नुकतेच सुहाना खानने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये सुहानाने पांढऱ्या रंगाचे टँक टॉप आणि ब्लू शॉर्ट्स परिधान केलेले दिसत आहे.

सुहानाच्या हातात कोल्ड ड्रिंक पहायला मिळत आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, समजा ही पेप्सी आहे आणि मी सिंडी क्रॉफोर्ड आहे.


सिंडी क्रॉफोर्डसारखे सुहानाला दिसायचे आहे. खरेतर सिंडी क्रॉफोर्ड एक मॉडेल आहे, जिची पेप्सीची जाहिरात खूप लोकप्रिय झाली होती. १९९२ सालची पेप्सीच्या जाहिरातीमधील सिंडीचा लूक सुहानाने रिक्रिएट केला आहे आणि तेही आपल्या अंदाजात.

Web Title: Shah Rukh Khan's daughter Suhana is working on a project in New York ?, a new look is going viral