शाहरुखची लेक सुहाना खान अडचणीत, स्वत:ला शेतकरी दाखवून खरेदी केली होती जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:21 IST2025-09-03T15:16:29+5:302025-09-03T15:21:38+5:30
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शाहरुखची लेक सुहाना खान अडचणीत, स्वत:ला शेतकरी दाखवून खरेदी केली होती जमीन
Suhana Lands In Legal Trouble: अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिच्या आगामी चित्रपटामुळे नाही, तर जमीन खरेदीच्या एका वादामुळे. सुहानावर अलिबागच्या थल गावातील शेतकऱ्यांसाठी असलेली जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप आहे. जमीन खरेदी करताना केलेल्या नोंदणीकृत कागदपत्रांमध्ये सुहाना खानला शेतकरी म्हणून दाखवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुहानाने एका व्यावसायिकाकडून १३ कोटी रुपयांची जमीन खरेदी केली. ही जमीन खरेदी करताना तिने स्वतःला शेतकरी असल्याचं दाखवलं. याशिवाय, तिनं आवश्यक कागदपत्रे आणि परवानगी पूर्ण केली नसल्याचा आरोप आहे. ३० मे २०२३ रोजी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमार्फत ही जमीन हस्तांतरित करण्यात आली होती आणि यासाठी ७७ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. उपजिल्हाधिकारी संदेश शिक्रे यांनी अलिबागच्या तहसीलदारांकडून या प्रकरणात निष्पक्ष अहवाल मागितला आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सुहाना खान सध्या तिच्या आगामी 'किंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यात ती तिच्या वडील शाहरुख खानसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. २०२३ मध्ये तिचा पहिला चित्रपट 'द आर्चीज' ओटीटीवर प्रदर्शित झाला होता, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.