...तर मला काम मिळणार नाही! शाहरुख खानला सतावू लागली ‘झिरो’ बनण्याची चिंता!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 14:06 IST2018-12-19T14:05:26+5:302018-12-19T14:06:39+5:30
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान याचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिट झालाय. पण चित्रपट हिट होतो की नाही, हे तो प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे. तूर्तास तरी या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी शाहरुखला कधी नव्हे ते नर्व्हस दिसतोय.

...तर मला काम मिळणार नाही! शाहरुख खानला सतावू लागली ‘झिरो’ बनण्याची चिंता!!
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान याचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिट झालाय. पण चित्रपट हिट होतो की नाही, हे तो प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे. तूर्तास तरी या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी शाहरुखला कधी नव्हे ते नर्व्हस दिसतोय. होय, चित्रपट हिट झाला नाही तर...? असा प्रश्न त्याला भेडसावत आहे. अगदी ‘झिरो’ फ्लॉप झाला तर काम मिळणार नाही, अशी चिंता त्याला सतावते आहे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये शाहरुखने ही भीती बोलून दाखवली. ‘झिरो’ फ्लॉप झाला तर पुढचे सहा-आठ महिने मला काम मिळणार नाही, असे शाहरुख म्हणाला. अर्थात ही भीती स्वत:वर हावी होऊ देता, त्याने लगेच सारवासारवही केली. चित्रपटाचे भविष्य मी बदलू शकत नाही, त्यामुळे मी फार विचार करत नाही,असे तो म्हणाला. शाहरुखच्या या बोलण्यावरून ‘झिरो’ त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे आपण समजू शकतो.
अलीकडच्या काळात आलेले शाहरुखचे सिनेमे बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. ‘फॅन’, ‘रईस’ आणि ‘दिलवाले’ आणि यानंतर आलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ हे त्याचे सगळे सिनेमे आपटले. शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’या चित्रपटाचा बजेट ९० कोटी रुपये इतका होता. पण बॉक्स आॅफीसवर चित्रपटाने केवळ ६४.३३ कोटी रुपये कमावले. ‘फॅन’, ‘रईस’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांची गतही फार वेगळी नव्हती. त्यामुळे ‘झिरो’ शाहरुखसाठी महत्त्वाचा आहे. या चित्रपटानंतर शाहरुखच्या करिअरची दिशा कळणार आहे. ‘झिरो’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तेव्हा हा चित्रपट शाहरुखला किती यश मिळवून देतो, ते बघूच.