IPL वेळी स्मोकिंग करताना दिसला शाहरुख खान, नेटकऱ्यांना आठवली वानखेडेवरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 15:47 IST2024-03-24T15:37:26+5:302024-03-24T15:47:02+5:30

बंगाल क्रिकेट असोसिएशन शाहरुख खानवर कारवाई करणार का?

Shah Rukh Khan was caught on camera while smoking netizens remembered the Wankhede incident | IPL वेळी स्मोकिंग करताना दिसला शाहरुख खान, नेटकऱ्यांना आठवली वानखेडेवरची घटना

IPL वेळी स्मोकिंग करताना दिसला शाहरुख खान, नेटकऱ्यांना आठवली वानखेडेवरची घटना

शाहरुख खानची (Shahrukh Khan) धूम्रपानाची सवय अजूनही गेलेली नाही. याआधी त्याने अनेकदा स्मोकिंग सोडल्याचा दावा केला होता. पण आता किंग खान कॅमेऱ्यात पकडला गेला आहे. काल ईडन गार्डन येथील आयपीएल मॅचदरम्यान शाहरुख खानचाधूम्रपान करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हीआयपी बॉक्समधील हा त्याचा व्हिडिओ आहे. 

शाहरुख खानने धूम्रपान करुन ग्राऊंड स्टाफसोबत हुज्जत घातल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा हंगामा झाला होता. यानंतर शाहरुखला वानखेडेवर चार वर्षांची बंदीही घालण्यात आली. आता अनेक वर्षांनी पुन्हा स्टेडियममध्येच तो धूम्रपान करताना दिसल्याने सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. काल कोलकत्याच्या ईडन गार्डन ग्राऊंडवर आयपीएल 17 व्या सीझनची मॅच होती. कोलकाता विरुद्ध हैदराबाद असा हा सामना होता. यामध्ये कोलकत्याची टीम ४ धावांनी जिंकली.



ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये धूम्रपान केल्याच्या घटनेवर आता बंगाल क्रिकेट असोसिएशन शाहरुख खानवर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याबाबत अद्याप कोणतंही अपडेट आलेलं नाही. आयपीएल २०२४ च्या या तिसऱ्या सामन्यासाठी शाहरुख खानने हजेरी लावली होती. तो अनेकदा टीमला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये येतो. तर काही वेळा त्याच्यासोबत सुहाना, आर्यन आणि अबराम ही मुलंही असतात.शाहरुखचा हा लेटेस्ट व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे.

Web Title: Shah Rukh Khan was caught on camera while smoking netizens remembered the Wankhede incident