IMDbच्या 2023 च्या यादीत शाहरुख खान, सुहाना आणि प्रभासच्या सिनेमांचा समावेश, पाहा ही यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:11 PM2023-01-09T12:11:30+5:302023-01-09T12:12:34+5:30

IMDbने ही यादी यूजर्सच्या पेज व्ह्यूच्या आधारे जारी केली आहे. या यादीवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर सुपरस्टार्सचा दबदबा राहणार आहे.

Shah Rukh Khan, Suhana and Prabhas movies included in IMDb's 2023 list, check out this list | IMDbच्या 2023 च्या यादीत शाहरुख खान, सुहाना आणि प्रभासच्या सिनेमांचा समावेश, पाहा ही यादी

IMDbच्या 2023 च्या यादीत शाहरुख खान, सुहाना आणि प्रभासच्या सिनेमांचा समावेश, पाहा ही यादी

googlenewsNext

चित्रपट, टीव्ही शो आणि सेलिब्रिटींची माहिती देणार्‍या IMDb या वेबसाइटने या वर्षी आतुरतेने वाट पाहत असलेल्या 2023 चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. आयएमडीबीने ही यादी यूजर्सच्या पेज व्ह्यूच्या आधारे जारी केली आहे. या यादीवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर सुपरस्टार्सचा दबदबा राहणार आहे. या चित्रपटांच्या यादीत शाहरुख खान, अल्लू अर्जुन, प्रभास, सलमान खान, रणबीर कपूर, अजित कुमार, कमल हासन, अक्षय कुमार, अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांसारख्या स्टार्सच्या चित्रपटांचा समावेश आहे. अशाप्रकारे या यादीत साऊथ आणि बॉलिवूड स्टार्सच्या चित्रपटांची यादी आहे. विशेष म्हणजे या यादीत शाहरुख खानचे चित्रपट येत असतानाच त्याची मुलगी सुहाना खानच्या चित्रपटाचाही या यादीत समावेश झाला आहे.

IMDb ची 2023 ची सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी
1.    पठान
2.    पुष्पा: द रूल- पार्ट 2
3.    जवान
4.    आदिपुरुष
5.    सलार
6.    वेरीसू
7.    कब्ज़ा
8.    थलापथी 67
9.    द आर्चीज
10.    डुंकी
11.    टायगर 3
12.    किसी का भाई किसी की जान
13.    थुनिवू
14.    एनिमल
15.    एजंट
16.    इंडियन 2
17.    वादीवासाल
18.    शेहज़ादा
19.    बडे मियाँ छोटे मियाँ
20.    भोला 

हिंदी फिल्म्स ह्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये प्रामुख्याने आहेत, 11 हिंदी चित्रपट, 5 तमिल, 3 तेलुगु आणि 1 कन्नडा चित्रपट आहे. तीन वर्षांच्या विरामानंतर बॉलीवूडमधील सुपरस्टार शाह रूख खान तीन मोठ्या रिलीजेसमध्ये मुख्य भुमिका बजावताना दिसेल- पठान, जवान आणि डुंकी. एसआरकेची मुलगी सुहाना खान हीसुद्धा 2023 मध्ये झोया अख़्तरचा चित्रपट द आर्चीजसह पदार्पण करत आहे व हा चित्रपटसुद्धा ह्या यादीत 9 व्या स्थानी आहे. सुपरस्टार सलमान खानचेही ह्या यादीन दोन रिलीजेस आहेत- किसी का भाई किसी की जान आणि टायगर 3. इंडियन 2 हा 1996 चा ब्लॉकबस्टर चित्रपट इंडियन (हिंदुस्तानी) चा सिक्वेल आहे व त्यामध्ये कमल हसन परत एकदा दिग्दर्शक शंकर सोबत बघायला मिळेल. शेहज़ादामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भुमिकेत आहे व हाही एक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे व तो अल्लू अर्जुनचा तेलुगू सुपरहिट आला एकुंठापुरामुलूl चा रिमेक आहे तर भोला मध्ये अजय देवगन प्रमुख भुमिकेत आहे व तो 2019 चा तमिल चित्रपट कैथी चा रिमेक आहे. 

Web Title: Shah Rukh Khan, Suhana and Prabhas movies included in IMDb's 2023 list, check out this list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.