Pathaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 19:37 IST2023-02-08T18:17:21+5:302023-02-08T19:37:27+5:30
पठाण' (Pathaan)चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. 'पठाण' हा हिंदी सिनेसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Pathaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
Pathaan Highest Grossing Film: बॉलिवूडचा मेगा सुपरस्टार शाहरुख खान(Shah Rukh Khan) च्या 'पठाण' चित्रपटाची कमाई थांबण्याचे नाव घेत नाही आहे. 'पठाण' (Pathaan)चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी 'पठाण'ने रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण केले आहेत, यासोबतच 'पठाण'ने कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम केले आहेत. 'पठाण'बाबत मोठे अपडेट्स समोर येत आहेत. 'पठाण' हा हिंदी सिनेसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
पठाणने बनवले नवे रेकॉर्ड
25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'पठाण' चित्रपटाने पहिल्या दिवसापासून कमाईच्या बाबतीत जबरदस्त कमाल दाखवला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'पठाण'ने जगभरात 100 कोटींची कमाई केली, शाहरुख खानचा हा चित्रपट येत्या काही दिवसांत नवे रेकॉर्ड करु शकतो. बुधवारी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'पठाण'च्या लेटेस्ट कलेक्शनच्या आकडेवारीची माहिती दिली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, 'पठाण'ने रिलीजच्या 14 व्या दिवशी 7.50 कोटींचा गल्ला जमवला आहे, ज्यामुळे 'पठाण' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पठाण'ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दक्षिण सिनेमाचा ब्लॉकबस्टर सिनेमा KGF 2 ला मागे टाकले आहे. 'पठाण'चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता भारतातील सर्व भाषांमध्ये 446.02 कोटी आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, एसएस राजामौली आणि दक्षिण सिनेमाचा सुपरस्टार प्रभास यांच्या 'बाहुबली २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 510.99 कोटींचा व्यवसाय केला आहे. शाहरुख खानचा 'पठाण' हा या साऊथ चित्रपटाचा विक्रम मोडू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.