'किंग'च्या प्री-प्रोडक्शनला सुरुवात? लेक सुहानासोबत न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसला शाहरुख खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:39 IST2024-07-09T16:38:36+5:302024-07-09T16:39:40+5:30
आगामी 'किंग' या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाच्या प्री प्रोडक्शनसाठी दोघं न्यूयॉर्कमध्ये असल्याचं सांगितलं जातंय.

'किंग'च्या प्री-प्रोडक्शनला सुरुवात? लेक सुहानासोबत न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसला शाहरुख खान
बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या लेक सुहानासोबत (Suhana Khan) न्यूयॉर्कमध्ये आहे. तेथील दोघांचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगामी 'किंग' या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाच्या प्री प्रोडक्शनसाठी दोघं न्यूयॉर्कमध्ये असल्याचं सांगितलं जातंय. बापलेकीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
शाहरुख खानची लेक सुहाना खानने गेल्या वर्षी 'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर सुहाना तिच्या दुसऱ्याच सिनेमात वडिलांबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. सुहाना यामध्ये अॅक्शनही करताना दिसणार आहे. न्यूयॉर्कमधील व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये शाहरुख आणि सुहाना शॉपिंग करताना दिसत आहेत. शाहरुखने यावेळी चाहत्यांना ऑटोग्राफही दिल्याचं पाहायला मिळत आहे. बापलेक न्यूयॉर्क शहरात मनसोक्त फिरत आहेत. सुहानाने फ्लोरल टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. तर शाहरुख कॅज्युअल टीशर्ट आणि स्लीम फिट जीन्समध्ये दिसतोय.
चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करत शाहरुख खानची भरभरुन स्तुती केली आहे. 'या वयातही तो किती हँडसम दिसतोय','त्या शॉपमधले लोक किती नशिबवान आहेत' अशा कमेंट्स केल्या आहेत. तर एकाने 'किंग 2025' अशीही कमेंट केली आहे.
'किंग' सिनेमा सुजॉय घोष दिग्दर्शित करणार आहेत तर शाहरुख खान यामध्ये गँगस्टरच्या भूमिकेत असू शकतो. 'डॉन' फ्रँचायझीमधून बाहेर पडला असला तरी शाहरुख पुन्हा अॅक्शन रोलमध्ये दिसणार आहे. यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.