शाहरूख खानने प्रसिद्ध डीजे डिप्लोबरोबरचा सेल्फी केला शेअर; वाचा काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 18:15 IST2017-07-23T12:44:26+5:302017-07-23T18:15:42+5:30

​लोकप्रिय अमेरिकी डीजे डिप्लो हा बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातील ‘फुर्र’ हे गाणे गाणार आहे.

Shah Rukh Khan shares selfie with the famous DJ diplo; Read what the episode !! | शाहरूख खानने प्रसिद्ध डीजे डिप्लोबरोबरचा सेल्फी केला शेअर; वाचा काय आहे प्रकरण!!

शाहरूख खानने प्रसिद्ध डीजे डिप्लोबरोबरचा सेल्फी केला शेअर; वाचा काय आहे प्रकरण!!

कप्रिय अमेरिकी डीजे डिप्लो हा बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातील ‘फुर्र’ हे गाणे गाणार असून, त्याने शाहरूखबरोबर हातमिळवणी केल्याचे समजते. शाहरूखने डिप्लोबरोबरचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर करीत, या वृत्तास एकप्रकारचा दुजोरा दिला आहे. सेल्फीमध्ये शाहरूख पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये, तर डीजे डिप्लो काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये बघावयास मिळतो. 

शाहरूखने सेल्फी शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘डिप्लोने फुर्रसाठी काम केले आहे, त्यात त्याने एक भूमिकाही साकारली आहे, धन्यवाद!’ 
या गाण्याचे शूटिंग लिस्बन आणि स्पेनमध्ये करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरला चाहत्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देईल असेच काहीसे चित्र दिसत आहे. 
 

दरम्यान, शाहरूख आणि निर्माते या चित्रपटाचे प्रमोशन अतिशय हटके पद्धतीने करीत आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे मिनी ट्रेलर सातत्याने रिलीज केले जात होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता मुख्य ट्रेलर रिलीज केल्याने, प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. चित्रपटात शाहरूखसह अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचीही प्रमुख भूमिका आहे. यूरोप टूरदरम्यान दोन विभिन्य विचाराच्या तरुण-तरुणीमधील प्रेमकथा चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. रेड रिलीज एंटरटेनमेंटद्वारा निर्मित हा चित्रपट ४ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Shah Rukh Khan shares selfie with the famous DJ diplo; Read what the episode !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.