​शाहरूख खानवर दहावी शस्त्रक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 09:40 IST2017-03-12T04:10:26+5:302017-03-12T09:40:26+5:30

बॉलिवूड किंगखान शाहरूख खान याच्या यशामागे प्रचंड संघर्ष आणि कष्ट आहेत. कामावरची निष्ठा, जिद्द, चिकाटी हे त्याच्या या यशाचे ...

Shah Rukh Khan performs 10th surgery! | ​शाहरूख खानवर दहावी शस्त्रक्रिया!

​शाहरूख खानवर दहावी शस्त्रक्रिया!

लिवूड किंगखान शाहरूख खान याच्या यशामागे प्रचंड संघर्ष आणि कष्ट आहेत. कामावरची निष्ठा, जिद्द, चिकाटी हे त्याच्या या यशाचे गमक आहे. आता हेच बघा ना, शाहरूखवर कितीतरी शस्त्रक्रिया झाल्यात. पण थांबेल तो शाहरूख कुठला!
शाहरूखच्या खांद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर झालेली ही आतापर्यंतची दहावी शस्त्रक्रिया आहे. twitterवर खुद्द शाहरूखने ही माहिती दिली. तूर्तास डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.शाहरुख खानने twitterवर आपल्या उजव्या हाताचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलेय,‘नॉट मी’.  डॉक्टरांनी गोंधळ टाळण्यासाठी माझ्या हातावर ‘नॉट मी’असे लिहून निशाण बनवले होते.  माझ्या डाव्या खांद्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टरांनी उजव्या खांद्यावर निशाण बनविले जेणेकरून कोणतीही चूक होऊ नये.

{{{{twitter_post_id####}}}}


त्या खांद्यावरील शाहरुख खानची ही दुसरी सर्जरी आहे. अर्थात यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. या आधीही ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘रा वन’च्या शूटिंगच्या वेळेस त्याला दुखापत झाल्याने सर्जरी करावी लागली होती.‘चेन्नई एक्स्प्रेसच्या वेळेस दुखापत होऊनही त्याने शूटिंग पूर्ण केले होते. विशेष म्हणजे,त्यावेळेस त्याने डुप्लिकेटचा वापर करण्यास नकार दिला होता आणि स्वत:च स्टंट केले होते.



अलीकडे ‘रईस’च्या ट्रेलर लॉन्चवेळी शाहरूखच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला knee capलावलेली दिसली होती.   येत्या काही महिन्यांत शाहरूखच्या या गुडघ्यावर पुन्हा सर्जरी करावी लागणार असल्याची बातमी त्यावेळी आली होती. शाहरूखवर उपचार करणारे डॉ. संजय देसाई यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता.



२०१५ मध्ये शाहरूखच्या या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पाच महिन्यांपूर्वी या गुडघ्याचे दुखणे पुन्हा उमळले होते. डॉक्टरांनी पेनकिलर आणि इंजेक्शनने यावर उपचार केले होते. पण यामुळे शाहरूखला फारसा फायदा झालेला नव्हता.त्यामुळे १० महिन्यांत या गुडघ्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी शाहरूखला दिला होता.  

Web Title: Shah Rukh Khan performs 10th surgery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.