शाहरुख खानच्या ‘जवान’चा नवा रेकॉर्ड, ‘या’ चित्रपटगृहात सकाळी ६चा शो लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:58 IST2023-08-29T12:58:21+5:302023-08-29T12:58:50+5:30

शाहरुखचा ‘जवान’ प्रदर्शनाआधीच अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर करत आहे. आता आणखी एक रेकॉर्ड जवानने आपल्या नावावर केला आहे.

shah rukh khan jawaan movie to be first indian movie with 6am show in gaiety galaxy theatre | शाहरुख खानच्या ‘जवान’चा नवा रेकॉर्ड, ‘या’ चित्रपटगृहात सकाळी ६चा शो लागणार

शाहरुख खानच्या ‘जवान’चा नवा रेकॉर्ड, ‘या’ चित्रपटगृहात सकाळी ६चा शो लागणार

‘पठाण’ नंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. सगळीकडे त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ‘पठाण’प्रमाणेच शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टीझर आणि त्यातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते वाट पाहत आहेत. शाहरुखचा ‘जवान’ प्रदर्शनाआधीच अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर करत आहे. एडव्हान बुकिंगमधून हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. आता आणखी एक रेकॉर्ड जवानने आपल्या नावावर केला आहे.

शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाला सकाळी ६ वाजताचा शो मिळाला आहे. गेयटी गॅलेक्सी(Gaiety Galaxy) या थिएटरमध्ये शाहरुखचा ‘जवान’ चित्रपटाचा सकाळी ६ वाजताचा शो असणार आहे. शाहरुखच्या फॅन क्लबवरुन ही माहिती देण्यात आली आहे. “गेयटी गॅलेक्सी या आयकॉनिक थिएटरमध्ये सकाळी ९ वाजताच्या शोने पठाण चित्रपटाने रेकॉर्ड केला होता. आता या थिएटरमध्ये जवान चित्रपटाच्या ६ वाजताच्या शोमुळे आणखी एक रेकॉर्ड बनला आहे,” असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मध्ये मराठी चेहरा दिसणार; 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे पती विकी जैनसह एन्ट्री घेणार?

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचं दिग्दर्शन अटली कुमारने केलं आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपथी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘जवान’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही झळकणार आहे. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरुखचा जवान ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: shah rukh khan jawaan movie to be first indian movie with 6am show in gaiety galaxy theatre