​शाहरूख खानने प्रीतमला दिली अनमोल भेट! चॅरिटीसाठी होणार लिलाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 11:18 IST2017-07-21T05:48:01+5:302017-07-21T11:18:01+5:30

‘जब हॅरी मेट सेजल’ची गाणी प्रीतमने कम्पोज केली आहेत, हे तुम्ही जाणताच. ‘जब हॅरी मेट सेजल’मध्ये लीड रोलमध्ये असलेल्या शाहरूखला ही गाणी प्रचंड आवडली. मग अशात प्रीतमचे विशेष आभार तर मानायलाच हवेत ना.

Shah Rukh Khan gifted a precious gift to Pritam! Will be auctioned for charity !! | ​शाहरूख खानने प्रीतमला दिली अनमोल भेट! चॅरिटीसाठी होणार लिलाव!!

​शाहरूख खानने प्रीतमला दिली अनमोल भेट! चॅरिटीसाठी होणार लिलाव!!

हरूख खान व अनुष्का शर्मा यांच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या आगामी चित्रपटातील गाणी तुम्ही ऐकली असतीलच. ‘जब हॅरी मेट सेजल’ची गाणी प्रीतमने कम्पोज केली आहेत, हे तुम्ही जाणताच. ‘जब हॅरी मेट सेजल’मध्ये लीड रोलमध्ये असलेल्या शाहरूखला ही गाणी प्रचंड आवडली. मग अशात प्रीतमचे विशेष आभार तर मानायलाच हवेत ना.  शाहरूखने प्रीतमला एक स्पेशल गिफ्ट देऊन त्याचे आभार मानलेत. होय, शाहरूखने प्रीतमला एक गिटार गिफ्ट दिले. आपल्या सोशल अकाऊंटवर प्रीतम व त्याला गिफ्ट दिलेल्या गिटारचा एक फोटो शाहरूखने शेअर केला आहे.  ‘This guitar has had a Safar of its own. Gave it to @ipritamofficial before the film & he gifted me the beautiful music of JHMS in return’, असे सुरेख कॅप्शनही शाहरूखने या फोटोला दिले. आपल्या आवडत्या लोकांना  महागडे आणि आलिशान गिफ्ट देण्यासाठी शाहरूख प्रसिद्ध आहे. पण संगीतवेड्या प्रीतमसाठी गिटारपेक्षा आणखी दुसरी कुठली भेट योग्य ठरेल? शाहरूखच्या या गिफ्टने प्रीतमही कमालीचा सुखावला.



ALSO READ : आर्यन आणि सुहाना खानला सलमान खानने दिले 'हे' स्पेशल गिफ्ट!

शाहरूखच्या पोस्टला उत्तर देत प्रीतमने त्याचे मनापासून आभार मानलेत. थँक्स सर, यापेक्षा अनमोल भेट माझ्यासाठी असूच शकत नाही. ‘जब हॅरी मेट सेजल’च्या गाण्यांइतकीच तुम्ही दिलेली ही भेट माझ्यासाठी खास आहे आणि म्हणूनच ही भेट सार्थकी लागावी यासाठी चॅरिटीसाठी मी या गिटारचा लिलाव करणार आहे, असे प्रीतमने लिहिले. चॅरिटीसाठी शाहरूखने दिलेल्या गिफ्टचा लिलाव होणार असेल तर यापेक्षा आनंद दुसरा कुठला बरे असू शकेल.
‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रिलीज होतो आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे अनेक मिनी ट्रेलर आत्तापर्यंत रिलीज झाले आहेत. 

Web Title: Shah Rukh Khan gifted a precious gift to Pritam! Will be auctioned for charity !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.