बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान का रडला? व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:10 IST2025-05-20T10:51:16+5:302025-05-20T11:10:19+5:30

शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Shah Rukh Khan Crying Video Viral While Chopping Onions Farah Khan’s Cook Dilip Remind Kal Ho Naa Ho Emotional Climax | बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान का रडला? व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान का रडला? व्हिडीओ होतोय व्हायरल

Shahrukh Khan Crying Viral Video:बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) याला आज कोणत्या परिचयाची गरज नाही. आजवर त्याने त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जगभरात शाहरुख खानचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी त्याच्या घराबाहेर तासनतास थांबलेली असते. सोशल मीडियावर त्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. इंस्टाग्रामवरही त्याचे खूप फॅन फॉलोव्हर्स आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अभिनेत्याने हे प्रेम मिळवले आहे. शाहरुख हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आताही त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शाहरुखचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. त्याच्या चाहत्यांनी दु:खी होण्याचं कारण नाही. हे अश्रू कांदा कापल्यानं आलेत. व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा कांदा कापताना दिसतो, ज्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. या व्हिडीओमध्ये  शाहरुख खानसोबत फराह खानचा कूक दिलीप दिसून आलाय.  शाहरुखच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना पाहून

दिपील विनोद करण्याचा प्रयत्न करतो. त्याने या परिस्थितीची 'कल हो ना हो' च्या क्लायमेक्स सीनबरोबर केली. दिलीप म्हणतो,  "सर 'कल हो ना हो' सिनेमाच्या क्लायमेक्सची आठवण झाली". हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले असून, त्यावर मजेशीर कॉमेंट्सही करत आहेत.शाहरुख अशा कलाकारांपैकी एक आहे,  ज्यांनी अफाट यश मिळवलं असलं तरी पाय आजही जमिनीवरच आहेत. त्याच्यातील माणुसकीमुळे तो चाहत्यांना आणखी जवळचा वाटतो.


शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'किंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खान देखील दिसणार आहे. या चित्रपटाला घेऊन सगळे खूप उत्सुक आहेत. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे आणि रिलीजसाठी अजून थोडा वेळ लागणार आहे. दरम्यान, शाहरुख खान सगळ्यात शेवटी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकला होता.

Web Title: Shah Rukh Khan Crying Video Viral While Chopping Onions Farah Khan’s Cook Dilip Remind Kal Ho Naa Ho Emotional Climax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.